नेहा दिसणार सोज्ज्वळ भूमिकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2016 03:57 IST2016-06-19T03:57:43+5:302016-06-19T03:57:43+5:30
नेहा पेंडसे ही तिच्या ग्लॅमरस लूकसाठी ओळखली जाते, पण कलर्स मराठी वाहिनीवर लवकरच सुरू होणाऱ्या आवाज या सीरिजमधील ‘संत ज्ञानेश्वर’ या मालिकेत नेहा

नेहा दिसणार सोज्ज्वळ भूमिकेत
नेहा पेंडसे ही तिच्या ग्लॅमरस लूकसाठी ओळखली जाते, पण कलर्स मराठी वाहिनीवर लवकरच सुरू होणाऱ्या आवाज या सीरिजमधील ‘संत ज्ञानेश्वर’ या मालिकेत नेहा एका वेगळ्याच भूमिकेत झळकणार आहे. ही भूमिका नॉन ग्लॅमरस असून, नेहाचा या मालिकेतील लूकही खूपच वेगळा असणार आहे. या मालिकेच्या चित्रीकरणाला नेहा लवकरच सुरुवात करणार असल्याचे कळतेय.