धर्माच्या नावावर राजकारण करण्याऱ्यांना नवाजुद्दीनची चपराक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2017 20:57 IST2017-04-24T20:30:30+5:302017-04-24T20:57:59+5:30

गँग ऑफ वासेपूर फेम अभिनेता नवाजुद्दीननेही या व्हिडिओमध्ये एकापाठोपाठ एक फलक दाखवत त्याचे मत व्यक्त केले आहे.

Nawazuddin Chaparak to politicians in the name of religion | धर्माच्या नावावर राजकारण करण्याऱ्यांना नवाजुद्दीनची चपराक

धर्माच्या नावावर राजकारण करण्याऱ्यांना नवाजुद्दीनची चपराक

tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - गुरमेहर कौरचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यात तिने एकही शब्द न उच्चारता फलकांद्वारे तिचं मत मांडलं होतं. त्याचप्रमाणे गँग ऑफ वासेपूर फेम अभिनेता नवाजुद्दीननेही या व्हिडिओमध्ये एकापाठोपाठ एक फलक दाखवत त्याचे मत व्यक्त केले आहे. नवाजुद्दीन सिद्दिकी प्रसिद्ध हिंदी-ऊर्दू साहित्यिक सआदत हसन मंटो यांच्या बायोपिकवर येणाऱ्या चित्रपटाच्या चित्रिकरणात बिझी आहे. आपल्या खास अभिनयशैलीत नवाजने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. आज सकाळी नवाजुद्दीनने एक व्हिडिओ अपलोड केला आहे ज्यात प्लेकार्डच्या मदतीने त्यांने सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
या व्हिडिओमध्ये त्यांने प्लेकार्डच्या माध्यमातून स्वत:चा परिचय दिला आहे. यात नवाजुद्दीन म्हणतो आहे त्यांने डीएनए टेस्ट केली आहे ज्यात 16.66 % हिंदू , 16.66 % ख्रिश्चन, 16.66 % मुस्लिम असल्याचे समोर आले आहे. याचा अर्थ मी 100 % फक्त कलाकार असल्याचे नवाजने म्हटले आहे. नवाजुद्दीनचा हा व्हिडिओ धर्माच्या नावाखाली राजकारण करण्याना एक चपराक आहे.
एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत नवाजुद्दीन म्हणाला या व्हिडिओ तयार करण्यामागे काही खास कारण नव्हते. हा व्हिडिओ कोणत्याही चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तयार करण्यात आलेला नाही आहे.

वर्षाच्या सुरुवातीला आलेल्या रईस चित्रपटात शाहरुख खानपेक्षा नवाजउद्दीनचा अभिनय प्रेक्षकांच्या जास्त लक्षात राहिला होता. नवाजुद्दीनचे 4 चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार आहे. मुन्ना माइकल, मंटो, मॉम आणि बाबुमोशाय बंदूकबाज या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Web Title: Nawazuddin Chaparak to politicians in the name of religion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.