नर्गिस-ए-मस्ताना

By Admin | Updated: May 13, 2016 01:49 IST2016-05-13T01:49:19+5:302016-05-13T01:49:19+5:30

स्वत:कडे गांभीर्याने पाहणाऱ्या हिंदी चित्रपट अभिनेत्रींपेक्षा ती खूप मजेदार, आनंदी आणि विचित्र आहे. त्याचवेळी इतर अभिनेत्रींपेक्षाही खूप सुंदरदेखील आहे

Nargis-e-Mastana | नर्गिस-ए-मस्ताना

नर्गिस-ए-मस्ताना

स्वत:कडे गांभीर्याने पाहणाऱ्या हिंदी चित्रपट अभिनेत्रींपेक्षा ती खूप मजेदार, आनंदी आणि विचित्र आहे. त्याचवेळी इतर अभिनेत्रींपेक्षाही खूप सुंदरदेखील आहे. मराठी शिव्या आणि हिंदी संवाद यांच्यावर ‘जोक्स’ करतानाच नर्गिसने ‘सीएनएक्स’च्या एडिटर जान्हवी सामंत यांच्याशी ‘अज़हर’ या तिच्या आगामी हिंदी चित्रपटातील संगीता बिजलानीच्या वादग्रस्त भूमिकेविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
प्रश्न : ‘अज़हर’मधील तुझ्या भूमिकेविषयी सांग?
अनेक जणांना अज़हरुद्दीन याची पत्नी आणि संगीता बिजलानी त्यांच्या आयुष्यात कशी आली हे माहिती आहे. हा अत्यंत सुंदर दस्तऐवज आहे, परंतु आम्हाला त्यांच्या भावनिक प्रवासाविषयी काही माहिती नाही. हा चित्रपट त्यांच्या प्रेमकथेविषयी आहे. आपण सर्वांनीच संगीताला आॅनस्क्रीन पाहिले आहे. ती नेहमीच ग्लॅमरस राहिली आहे. पण, पूर्वाश्रमीची मॉडेल असणाऱ्या संगीताला आपण खरं ओळखतो का? ती यापूर्वीही तिच्या संबंधाविषयी चर्चेत राहिली होती, परंतु तिने प्रत्येक वेळा हा विषय अत्यंत सभ्यतापूर्वक हाताळला. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि नंतर अयशस्वी ठरले. मात्र त्यांनी प्रेम करण्याचे धाडस तर दाखविले. मी तिची सभ्यता आणि आकर्षण राखण्याचा प्रयत्न या चित्रपटात केला आहे. व्यक्ती म्हणून मी खूप उत्साही आणि आनंदी आहे. मी संगीताप्रमाणे नेहमीच संयम आणि स्त्रीत्व जपले आहे. हे सोपे नव्हते, मी खूप रडले, माझे नखरे फेकून दिले, मी खूप वेळा रागाला आले. पण, तिने यापैकी काहीही केले नाही.
प्रश्न : या चित्रपटातील तुझ्या अनुभवाबद्दल काय सांगशील?
खूप जबरदस्त! भावनिकरीत्या मला खूपकाही शिकायला मिळाले. अज़हरचे आयुष्य हे लोकांसाठी खुले राहिले आहे. लोकांनी आपापल्या परीने आपले मत मांडले, परंतु या जोडप्याने त्यांच्या मनाला जे भावले तेच केले. अनेक विवाहित आपल्या पार्टनरसोबत राहत नाहीत, परंतु संबंध कायम ठेवतात. त्यांना इतरांनी नावे ठेवलेली आवडत नाहीत. मला असे वाटते की, आपल्याला एकच आयुष्य आहे आणि लोक म्हणतात म्हणून आपण त्यात बदल करता कामा नये.
प्रश्न : या चित्रपटानंतर पुढे काय?
हे वर्ष माझ्यासाठी खूपच क्रेझी आहे. अज़हरनंतर मी ‘हाउसफुल्ल
३’च्या प्रमोशनमध्ये बिझी असणार आहे. त्यानंतर ढिशूम येतो आहे, बँजोचे शूटिंग थोडेफार राहिले आहे. ही आणखी एक क्रेझी फिल्म आहे. त्याचे शूटिंग न्यू यॉर्कमध्ये झाले आहे. बँजोच्या पात्रामधून मी मराठीमधील अनेक वाईट शब्द शिकले. बँजोनंतर मी थोडासा ब्रेक घेणार आहे.
प्रश्न : तुझे आणि प्राची देसाईचे पटत नसल्याचे सांगण्यात येते?
लोक खूप विचित्र वागतात. फिल्म इंडस्ट्रीमध्ये लोक पाठीमागे बोलतात. त्यांचा फावला वेळ असा वाया घालवितात. अनेक जण ताण देण्यासाठीच जन्मलेले असतात. मला वाटते अभिनेत्रींनी एकमेकांना पाठिंबा द्यावा आणि मदतही करावी. हे जग सोपे नाही आणि या जगात शत्रूंपेक्षा आम्ही अधिक प्रमाणात मित्र तयार करायला हवेत. प्राची ही खूप गोड मुलगी आहे. आम्हाला कोणतीही अडचण नाही. मला खूप साऱ्या मैत्रिणी नाहीत, मी सेटवर नेहमीच विनोदी राहते आणि मजेशीर वागते.
प्रश्न : भारतीय अभिनेत्री खूप गांभीर्याने वावरतात असे तुला वाटते?
होय हे खरंय! मला एकदा एका निर्मात्याने सांगितले की, सुंदर महिला या विनोदी नसतात. त्या खूप संयमी आणि गोड असतात. मला हे खूप विनोदी वाटले. मी स्वत:विषयी अनेक विनोद सांगते आणि लोकांना हसविते. मला असे वाटते की, तुमच्या सोबत असणारे लोक नेहमी सहजगत्या वावरणारे असावेत. महिलांनी मोकळे असावे, त्यामुळे त्यांना अनेक चांगले मित्र मिळतात.

Web Title: Nargis-e-Mastana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.