नंदिनीचे होणार अपहरण

By Admin | Updated: February 15, 2017 03:01 IST2017-02-15T03:01:09+5:302017-02-15T03:01:09+5:30

चंद्र-नंदिनी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या नंदिनीचे अपहरण झाल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चंद्र-नंदिनी या मालिकेत

Nandini will be kidnapped | नंदिनीचे होणार अपहरण

नंदिनीचे होणार अपहरण

चंद्र-नंदिनी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या नंदिनीचे अपहरण झाल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चंद्र-नंदिनी या मालिकेत नंदिनीने महाराणी बनण्यासाठी स्वीकारलेली सर्व आव्हाने आता पूर्ण केली आहेत. त्यामुळे आता ती महाराणी बनली असल्याचे आपल्याला लवकरच मालिकेत पाहायला मिळेल. महाराणीच्या गादीवर नंदिनीला बसविण्यासाठी आता काही विधी केले जाणार आहेत आणि त्याची जय्यत तयारी सुरू आहे. पण, हे विधी करण्यापूर्वी नंदिनीने राजवाड्यात न राहता काही दिवस गावात राहावे, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे ती काही दिवसांसाठी चंद्रसोबत गावात राहायला जाणार आहे. पण, राज्याभिषेकासाठी गावाहून राजवाड्यात परतत असताना नंदिनीचे अपहरण होईल आणि तिचे अपहरण दुसरे कोणी नाही तर रूपा करणार आहे. रूपा ही नंदिनीसारखीच दिसणारी एक मुलगी आहे. रूपा नंदिनीचे अपहरण करून राजवाड्यात तिची जागा घेणार आहे आणि तिच्या लोकांना नंदिनीला मारून टाकायला सांगणार आहे. नंदिनीची हत्या करून राणीच्या गादीवर बसण्याची तिची इच्छा आहे; पण राजवाड्यात आल्यानंतर चंद्र ज्या वेळी नंदिनीला म्हणजेच रूपाला भेटेल, त्या वेळी तिच्या वागणुकीत खूप बदल झाल्याचे त्याला जाणवेल आणि तिच्या वागणुकीत इतका बदल कसा काय होऊ शकतो, यामागचे रहस्य शोधण्याचा तो प्रयत्न करील. चंद्रला रूपाचे खरे रूप कळते का? आणि रूपाच्या तावडीतून तो नंदिनीची सुटका करतो का? तसेच, नंदिनी जिवंत राहाते की नाही? यांची उत्तरे प्रेक्षकांना पुढील काळात पाहायला मिळतील.

Web Title: Nandini will be kidnapped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.