नाना बनणार ‘शेर खान’

By Admin | Updated: March 11, 2016 02:09 IST2016-03-11T02:09:30+5:302016-03-11T02:09:30+5:30

जंगल जंगल बात चली है, पता चला है..चड्डी पहनके फूल खिला है, फूल खिला है... काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर येणाऱ्या ‘मोगली’ या अ‍ॅनिमेटेड मालिकेतील या शीर्षक गीताने बच्चे कंपनीला अगदी वेड लावले होते.

Nana to become 'Sher Khan' | नाना बनणार ‘शेर खान’

नाना बनणार ‘शेर खान’

जंगल जंगल बात चली है, पता चला है..चड्डी पहनके फूल खिला है, फूल खिला है... काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर येणाऱ्या ‘मोगली’ या अ‍ॅनिमेटेड मालिकेतील या शीर्षक गीताने बच्चे कंपनीला अगदी वेड लावले होते. बच्चे कंपनीच नाही, तर अगदी थोरले-मोठेही या मालिकेच्या प्रेमात पडले होते. जंगलांमध्ये प्राण्यांसोबत राहणारा तोच ‘मोगली’ आता रूपेरी पडद्यावर येणार आहे. डिजनीचा ‘दी जंगल बुक’ हा अ‍ॅनिमेटेड चित्रपट हिंदीतही डब केला गेला आहे. यात प्रियांका चोपडा, इरफान खान, ओम पुरी व शेफाली शहा या दिग्गजांनी आपला आवाज दिला आहे. विशेष म्हणजे, ९० च्या दशकात दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या ‘मोगली’ मालिकेतील ‘शेर खान’ या पात्राला अभिनेता नाना पाटेकर याने आपला आवाज दिला होता. आता या अ‍ॅनिमेटेड चित्रपटातही नानानेच ‘शेर खान’ला आवाज दिला आहे. हा चित्रपट १९६७ मध्ये वाल्ट डिजनीच्या मूळ अ‍ॅनिमेटेड रूपात याच नावाने साकारलेल्या चित्रपटाचा रीमेक आहे. या चित्रपटाच्या इंग्रजी आवृत्तीत बिल मुरे, बेन किंग्सले, इदरिस एल्बा, ल्युपिटा न्योंगओ, स्कारलेट जॉन्सन, क्रिस्टोफर वाल्कन व जियानकार्लो स्पोसितो यांनी आवाज दिला आहे. हिंदीतील चित्रपटास प्रियांका, इरफान, शेफाली व ओम पुरींनी आवाज दिला आहे. प्रियांकाने ‘का’या अजगरच्या पात्रास, इरफानने ‘बल्लू’ या अस्वलाच्या पात्रास तर शेफालीने ‘रक्षा’ या लांडग्याच्या पात्रास आवाज दिला आहे. ओम पुरी यांनी ‘बघीरा’ नामक काळ्या चित्त्यास आपला आवाज दिला आहे. भारतात येत्या ८ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

Web Title: Nana to become 'Sher Khan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.