नागराजने केले ‘मित्रा’चे कौतुक
By Admin | Updated: May 4, 2015 22:35 IST2015-05-04T22:35:37+5:302015-05-04T22:35:37+5:30
एकाच इंडस्ट्रीमध्ये राहून एकमेकांचे कौतुक करणे कठीणच गोष्ट आहे. पण ही अशक्य गोष्ट केवळ मराठी इंडस्ट्रीतच शक्य होऊ शकते.

नागराजने केले ‘मित्रा’चे कौतुक
एकाच इंडस्ट्रीमध्ये राहून एकमेकांचे कौतुक करणे कठीणच गोष्ट आहे. पण ही अशक्य गोष्ट केवळ मराठी इंडस्ट्रीतच शक्य होऊ शकते. राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘फँड्री’ सिनेमाचा दिग्दर्शक नागराज मंजुळेने ‘मित्रा’ या लघुपटाच्या राष्ट्रीय भरारीसाठी रवी जाधवचे कौतुक केले आहे. नुकतेच फेसबुकवर पोस्ट करून या लघुपटाची आणि रवी जाधव यांच्या कामाची स्तुती केली आहे.