'नाडियादवाला' आता मराठीत!!

By Admin | Updated: December 20, 2014 21:10 IST2014-12-20T21:10:33+5:302014-12-20T21:10:33+5:30

अमराठी असणाऱ्या प्रॉडक्शन कंपन्यांची पावले आता मराठी सिनेसृष्टीकडे वळू लागली आहेत.

Nadiadwala now in Marathi !! | 'नाडियादवाला' आता मराठीत!!

'नाडियादवाला' आता मराठीत!!

अमराठी असणाऱ्या प्रॉडक्शन कंपन्यांची पावले आता मराठी सिनेसृष्टीकडे वळू लागली आहेत. मनोरंजनाच्या क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या नाडियादवाला या प्रस्थापित फिल्म प्रॉडक्शन कंपनीने ‘नाडियादवाला जेननेक्स्ट प्रॉडक्शन्स’ची घोषणा केली. व्हीटीबी एण्टरप्रायझेसच्या वैभव भोर यांनी त्यांच्यासोबत हातमिळवणी केली असून या दोन महत्त्वपूर्ण कंपन्यांनी एकत्र येत ‘मर्डर मेस्त्री’ या मराठमोळ्या सिनेमाची घोषणा केली आहे. तारे तारकांची मांदियाळी या आगामी सिनेमात आपल्याला अनुभवायला मिळेल. या सिनेमात अभिनेते दिलीप प्रभावळकर, ह्रषिकेश जोशी, विकास कदम, अभिनेत्री वंदना गुप्ते, क्रांती रेडकर, कमलाकार सातपुते, संजय खापरे, मानसी नाईक, देवेंद्र भगत अशा एकापेक्षा एक वरचढ कलाकारांच्या समावेश असणार आहे.

Web Title: Nadiadwala now in Marathi !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.