'नाच गं घुमा' स्वप्नील जोशीसाठी ठरला खास!, म्हणाला-"निर्मिती करायचं दडपण होतं पण..."

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 11:42 AM2024-04-30T11:42:14+5:302024-04-30T11:42:56+5:30

Nach Ga Ghuma Movie : प्रेक्षकांची प्रतीक्षा आता संपणार असून उद्या नाच गं घुमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे आणि याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. स्वप्नीलचा निर्मिती म्हणून असलेला हा पहिला वहिला चित्रपट आहे.

'Nach Ga Ghuma' was special for Swapnil Joshi!, said-"There was pressure to produce but..." | 'नाच गं घुमा' स्वप्नील जोशीसाठी ठरला खास!, म्हणाला-"निर्मिती करायचं दडपण होतं पण..."

'नाच गं घुमा' स्वप्नील जोशीसाठी ठरला खास!, म्हणाला-"निर्मिती करायचं दडपण होतं पण..."

स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) म्हटलं की डोळ्यासमोर एखादा छान रोमँटिक चित्रपट नक्कीच येतो पण यावेळी चित्र थोडे वेगळे आहे. कारण स्वप्नील जोशी निर्मात्याच्या भूमिकेत आहे आणि म्हणून 'नाच गं घुमा'(Nach Ga Ghuma Movie)सारखा चित्रपट घडतोय ! सोशल मीडियावर चित्रपटाच्या चर्चांना उधाण असताना स्वप्नील अभिनयाच्या सोबतीने निर्मिती देखील उत्तम करणार यात शंका नाही. प्रत्येक प्रमोशनला आवर्जून हजेरी लावत स्वप्नीलने नाच गं घुमा चित्रपटातील स्टारकास्टसोबत खूप धमाल केली आहे. 

प्रेक्षकांची प्रतीक्षा आता संपणार असून उद्या 'नाच गं घुमा' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे आणि याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. स्वप्नीलचा निर्मिती म्हणून असलेला हा पहिला वहिला चित्रपट आहे. याबद्दल स्वप्नील म्हणाला की, बघता बघता उद्या आमचा चित्रपट तुमच्या भेटीला येतोय. तुम्ही त्याला भरभरून प्रेम द्याल यात शंका नाही. निर्मिती करायचे दडपण होते पण प्रमोशन आणि सोशल मीडियावरून या चित्रपटाला तुम्ही जे प्रेम देताय ते बघून खूप आनंद होतोय. 

पुढे म्हणाला की, मला अभिनेता म्हणून जसं स्वीकारलं तसच एक निर्माता म्हणून देखील आपलंसं करून घ्याल याची खात्री आहे. चित्रपट प्रदर्शित व्हायला मोजून काही तास उरले आहेत पण आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे 

वर्कफ्रंट

यंदाच्या वर्षात स्वप्नील जोशी अजून एका भन्नाट स्त्रियांच्या चित्रपटात दिसणार आहे आणि तो म्हणजे बाई गं. याबद्दल लवकरच तो प्रेक्षकांना सांगणार असल्याचे कळत आहे. नाच गं घुमा नंतर आता बाई गं आणि जिलबी अश्या दर्जेदार चित्रपटातून स्वप्नील प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे.

Web Title: 'Nach Ga Ghuma' was special for Swapnil Joshi!, said-"There was pressure to produce but..."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.