माझ्या आयटम सॉंगचा मुलावर परिणाम नाही - मलायका

By Admin | Updated: April 20, 2015 12:35 IST2015-04-20T12:32:15+5:302015-04-20T12:35:18+5:30

'मुन्नी बदनाम' फेम अभिनेत्री मलायका अरोरा - खान बॉलीवूडमध्ये आयटम नंबरसाठी प्रसिद्ध आहे.विशेष बाब म्हणजे तिच्या मुलानेही आईची ही प्रतिमा सहज स्वीकारली आहे.

My item is not affected by Song's child - Malaika | माझ्या आयटम सॉंगचा मुलावर परिणाम नाही - मलायका

माझ्या आयटम सॉंगचा मुलावर परिणाम नाही - मलायका

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २० - 'मुन्नी बदनाम' फेम अभिनेत्री मलायका अरोरा - खान बॉलीवूडमध्ये आयटम नंबरसाठी प्रसिद्ध आहे.विशेष बाब म्हणजे तिच्या मुलानेही आईची ही प्रतिमा सहज स्वीकारली आहे. 'मी केलेल्या आयटम सॉंगचा माझ्या मुलावर काहीही परिणाम होत नाही' असे मलायकाने स्पष्ट केले आहे. 

दिल से या चित्रपटातील छैय्या छैय्या, दबंगमधील मुन्नी बदनाम या गाण्यांमधील दिलखेचक नृत्याने प्रेक्षकांची दाद मिळवणा-या मलायका अरोरा खानचा मुलगा अरहान आता १३ वर्षांचा झाला आहे. अरहानला त्याच्या आईच्या इमेजविषयी काय वाटते याची उत्सुकता सर्वांनाच असते. याविषयी मलायकाला प्रश्न विचारला असता मलायका म्हणते, मला डान्स करायला आवडते व ते मी मनापासून इन्जॉय करते. माझ्या कामाचा माझ्या मुलावर काहीही परिणाम होत नाही. त्याला या गोष्टींची सवय झाली आहे. 

माझा मुलगा अरहान अजून लहान आहे. पण त्याला माझे गाणे आवडले तर तो स्वतःच मला येऊन सांगतो असे मलायकाने म्हटले आहे. गाणी हे चित्रपटातील महत्त्वाचे घटक असून गाण्यांमध्ये काम करणे हा नेहमीच मजेशीर अनुभव असतो. फक्त ते गाणे कसे चित्रीत केले जाते व ते कसे दाखवले जाईल हे महत्त्वाचे असते असे मलायका नमूद करते.  

 

Web Title: My item is not affected by Song's child - Malaika

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.