माझे चित्रपट व्यावसायिक पण वेगळे : अक्षय कुमार
By Admin | Updated: April 2, 2015 19:58 IST2015-04-02T18:13:35+5:302015-04-02T19:58:38+5:30
माझे चित्रपट हे व्यावसायिक स्वरुपाचे असतात पण ते वेगळया धाटणीचे असतात आपल्याला चित्रपटातून कोणताही सामाजिक संदेश द्यायचा नसतो असे बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचे म्हणने आहे.

माझे चित्रपट व्यावसायिक पण वेगळे : अक्षय कुमार
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ - माझे चित्रपट हे व्यावसायिक स्वरुपाचे असतात पण ते वेगळया धाटणीचे असतात आपल्याला चित्रपटातून कोणताही सामाजिक संदेश द्यायचा नसतो असे बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचे म्हणने आहे.
माझे चित्रपट हे व्यावसायिक असून आपल्याला कोणताही सामाजिक संदेश द्यायचा नसतो. मी नेहमीच वेगळे विषय असलेल्या चित्रपटाची निवड करीत असतो. 'ओह माय गॉड' (डटॠ )चित्रपटात धर्मावर बोट ठेवले आहे तर 'बेबी' चित्रपटात दहशतवाद दाखविण्यात आला आहे. आता नुकताच येवू घातलेला 'गब्बर इज बॅक' या चित्रपटात भ्रष्टाचारावर भाष्य करण्यात आले आहे. प्रेक्षकांना काय हवे हे आपल्याला चांगले माहित असल्याचे अक्षय म्हणाला.