‘दिवानी’चा सेट बनला म्युझियम
By Admin | Updated: November 4, 2015 03:35 IST2015-11-04T03:35:55+5:302015-11-04T03:35:55+5:30
दि ग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा आगामी चित्रपट ‘बाजीराव मस्तानी’ त्याच्या ग्रँड सेट आणि कथेसाठी चर्चिला जात आहे. या चित्रपटातील गाणे ‘दिवानी मस्तानी’ साठी
‘दिवानी’चा सेट बनला म्युझियम
दि ग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा आगामी चित्रपट ‘बाजीराव मस्तानी’ त्याच्या ग्रँड सेट आणि कथेसाठी चर्चिला जात आहे. या चित्रपटातील गाणे ‘दिवानी मस्तानी’ साठी लाहोरचा शीश महल प्रेरणादायी ठेवला होता. या सेटला मुंबई फिल्मसिटी मधील बऱ्याच व्हिजिटर्सनी भेट दिली. दीपिका याविषयी बोलताना म्हणाली,‘ दिवानी मस्तानी’ चा सेट बनवण्यासाठी
खुपच कष्ट घ्यावे लागले. आम्हाला त्या सेटला काढावे वाटलेच नाही.
ते एखाद्या म्युजियमप्रमाणे वाटत
होते. लोकांनी येऊन हा सेट पहावा कारण असे सेट ज्यांना आपण स्क्रिनवर पाहतो त्यांना बनवायला किती मेहनत घ्यावी लागते, हे त्यांना कळावे म्हणून हा सेट असाच ठेवण्यात आला आहे. ’