एम.एस.धोनी मराठीत नको - मनसेने दर्शवला विरोध

By Admin | Published: August 20, 2016 02:28 PM2016-08-20T14:28:55+5:302016-08-20T14:36:03+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 'एम.एस.धोनी- दि अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटाच्या मराठी भाषेतील प्रदर्शनास जोरदार विरोध दर्शवला आहे

M.S. Dhoni does not want Marathi - MNS has protested | एम.एस.धोनी मराठीत नको - मनसेने दर्शवला विरोध

एम.एस.धोनी मराठीत नको - मनसेने दर्शवला विरोध

googlenewsNext
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा मराठीचा राग आळवला असून  क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावरील आधारित 'एम.एस.धोनी- दि अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटाच्या मराठी भाषेतील प्रदर्शनास जोरदार विरोध दर्शवला आहे. 'हिंदी चित्रपट मराठीत डब होऊन प्रदर्शित होऊ लागल्यास मराठी चित्रपटांना मोठ्या स्पर्धेचा सामना करावा लागेल , त्यामुळेच हा चित्रपट मराठीत प्रदर्शित होऊ देणार नाही' अशी भूमिका मनसेने मांडली आहे. ' आमचा एम.एस.धोनी चित्रपटाल विरोध नाही, मराठी माणसं हिंदीतील चित्रपट पहायला जातात की, त्यांना ती भाषा कळतेच. त्यामुळेच एखादा हिंदी चिच्रपट मराठीत डब करण्याची गरज नाही. एकतर आधीच मराठी चित्रपटांना प्राईम टाईमचे शो मिळण्यात असंख्य अडचणी येतात, त्यातच आता हिंदी चित्रपट मराठीतही प्रदर्शित व्हायला लागले मराठी चित्रपटकर्ते व कलाकारांनी कुठे जायचं?' असा सवाल मनसे चित्रपच सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांनी विचारला आहे. 
भारतीय क्रिकेट संघाचा यशस्वी कप्तान म्हणून लौकिक मिळवणाऱ्या महेंद्रसिंग धोनी याचा चरित्रपट सर्वदूर पोहोचावा म्हणून तो हिंदीबरोबर तमिळ, तेलुगू आणि मराठी भाषेत प्रदर्शित करण्यात येणार आहे. धोनीचे चाहते देशभर असून त्यांच्या भाषेत या चित्रपटाची माहिती पोहोचावी यासाठी हे खास प्रयत्न केले जात आहेत. अभिनेता सुशांत सिंग राजपूतने या चित्रपटात मुख्य भूमिका निभावली आहे. 
 
आणखी वाचा : 
 
(VIDEO : कॅप्टन कूल ' धोनी'च्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच)
(‘कॅप्टन कूल’ धोनी पत्रकारांवर भडकला)
 
 

Web Title: M.S. Dhoni does not want Marathi - MNS has protested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.