पुस्तकांवर आधारित चित्रपट

By Admin | Updated: April 7, 2015 00:00 IST2015-04-07T00:00:00+5:302015-04-07T00:00:00+5:30

  गाईड : प्रसिद्ध लेखक आर. के. नारायण यांच्या गाईड या कांदबरीवर आधारित १९६५ साली आलेल्या या चित्रपटात देव ...

Movies based on books | पुस्तकांवर आधारित चित्रपट

पुस्तकांवर आधारित चित्रपट

 

गाईड : प्रसिद्ध लेखक आर. के. नारायण यांच्या गाईड या कांदबरीवर आधारित १९६५ साली आलेल्या या चित्रपटात देव आनंद व वहिदा रेहमान यांची मुख्य भूमिका होती.


 

 

 

 

पिंजर : प्रख्यात लेखिका व कवियत्री अमृता प्रितम यांच्या गाजलेल्या पिंजर या कादंबरीवर आधारित या चित्रपटात फाळणीच्या काळातील कहाणी दाखवण्यात आली आहे. उर्मिला मातोंडकर मनोज वाजपेयी संजय सूरी इशा कोप्पीकर यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका होती.


 

 

 

 

 

 

देवदास - शरदचंद्र चट्टोपाध्याय यांनी १९१७ लिहीलेल्या कादंबरीवर आत्तापर्यंत अनेक चित्रपट आले आहेत. १९५५ साली आलेल्या चित्रपटात दिलीपकुमार सुचित्रा सेन आणि वैजयंतीमाला यांनी प्रमुख भूमिका बजावल्या. तर २००२ साली दिग्दर्शक संजय लीला भन्साळीच्या चित्रपटात शाहरूख खान ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित यांची मुख्य भूमिका होती.


 

 

 

 

 

 

परिणीता : शरदचंद्र चट्टोपाध्याय यांनी १९१४ साली लिहिलेल्या परिणीता नावाच्या कांदबरीवर आधारित आलेल्या या चित्रपटात विद्या बालनने मुख्य भूमिका बजावली. अभिनेता सैफ अली खान आणि संजय दत्तही या चित्रपटात प्रमुख भूमिकेत होते.


 

 

 

 

 

 

हॅलो : चेतन भगतच्याच वन नाईट अ‍ॅट कॉल सेंटर या पुस्तकावर आधारित असलेल्या हॅलो चित्रपटात कॉल सेंटरमध्ये काम करणारे सहा कर्मचारी आणि त्यांच्या आयुष्यातील घटना दाखवण्यात आल्या आहेत. सलमान खान शर्मन जोशी गुल पनाग सोहेल खान इशा कोप्पीकर यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या.


 

 

 

 

 

 

काय पो छे : थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ या चेतन भगतच्या पुस्तकावर आधारित चित्रपटात गुजरातमधील तीन जिवलग मित्रांची कहाणी दाखवण्यात आली आहे. गुजरातमधील भूकंप तेथील दंगली या सर्व घटनांचा त्यांच्या आयुष्यावर काय परिणाम हे चित्रपटात मांडण्यात आले आहे.


 

 

 

 

 

 

३ इडियट्स :फाईव्ह पॉईंट समवन या चेतन भगतच्या पहिल्या पुस्तकावर आधारित असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवरील कमाईचे सर्व रेकॉर्ड्स मोडले. आमिर खान करीना कपूर आर. माधवन शर्मन जोशी आणि बोमन इराणी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात तीन मित्र त्यांचे कॉलेज जीवन याची कहाणी दाखवण्यात आली होती.


 

 

 

 

 

 

२ स्टेट्स : चेतन भगतच्या २ स्टेट्स या कादंबरीवर आधारित या चित्रपटात दोन वेगळ्या राज्यांतील प्रेमिकांची कहाणी सांगण्यात आली आहे. अर्जुन कपूर आणि आलिया भट्टसह रेवती अमृता सिंग यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या आहेत.


 

 

 

 

 

 

सरकार : २००५ साली आलेला या चित्रपटाचे दिग्दर्शन राम गोपाल वर्माने केले असून दि गॉडफादर या पुस्तकावरून व त्याच नावाने आलेल्या चित्रपटावरून हा चित्रपट प्रेरित आहे. यात अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चनने प्रमुख भूमिका साकारली होती.


 

 

 

 

 

 

डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी: लेखक शरदिंदु बंधोपाध्याय यांनी लिहीलेल्या कांदबरीतील मुख्य नायक असलेला ब्योमकेश हा एक गुप्तहेर असतो. याच कांदबरीवर आधारित दूरदर्शनवर आलेली मालिका खूप गाजली होती. आता याच कादंबरीवर चित्रपट आला असून दिबाकर बॅनर्जीने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात सुशांत सिंग राजपूतने मुख्य भूमिका निभावली आहे.


 

 

 

 

 

 

बॉम्बे वेल्व्हेट : प्रसिद्ध इतिहासकार ज्ञान प्रकाश यांच्या "मुंबई फॅबेल्स" या पुस्तकावर आधारित असलेल्या बाँबे वेल्व्हेट चित्रपटात रणबीर कपूर व अनुष्का शर्माची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटात रणबीरने स्ट्रीट फायटरची भूमिका केली असून तो एका अनोख्या लूकमध्ये दिसणार आहे. तर अनुष्का एका जॅझ गायिकेची भूमिका साकारत आहे. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होईल.


 

 

 

 

 

Web Title: Movies based on books

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.