चित्रपट सबकुछ सलमानमय
By Admin | Updated: July 26, 2014 00:01 IST2014-07-26T00:01:59+5:302014-07-26T00:01:59+5:30
सलमानच्या चित्रपटांना एक प्रेक्षकवर्ग आहे. पण मध्यंतरीच्या काळात त्याचे काही चित्रपट चालले नाहीत. त्या वेळी त्याला वाँटेड’ चित्रपटाने दिलासा दिला.

चित्रपट सबकुछ सलमानमय
सलमानच्या चित्रपटांना एक प्रेक्षकवर्ग आहे. पण मध्यंतरीच्या काळात त्याचे काही चित्रपट चालले नाहीत. त्या वेळी त्याला वाँटेड’ चित्रपटाने दिलासा दिला. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. या वर्षीच्या सुरुवातीलाच आलेल्या ‘जय हो’ची जादू चालली नाही. आज प्रदर्शित झालेल्या ‘किक’ चित्रपटात पुन्हा तो जुना सलमान पाहायला मिळाला. खरे तर सलमानचा चित्रपट म्हटला की कथेपेक्षा मसाल्यावर जास्त लक्ष दिले जाते. हाणामारीच्या दृश्यांपासून ते रोमान्स, कॉमेडीर्पयत सगळाच मामला चित्रपटात असतो. सलमानचा चित्रपट सुपरहिट होण्यासाठी जो मसाला अपेक्षित आहे तो ‘किक’ चित्रपटात पाहायला मिळतो.
कथा दिल्लीत घडते. दिल्लीत राहणारा देवीलाल सिंह (सलमान खान) हा अन्यायाच्या विरोधात लढणारा एक उमदा माणूस आहे. अन्यायाविरोधात लढताना नेहमी त्याला स्फूर्ती मिळते. तसेच त्याला मजामस्तीत जगायलाही आवडते. त्याच दरम्यान त्याची भेट मनोविकारतज्ज्ञ शायनाशी (ज्ॉकलीन फर्नाडिस) होते. दोघे प्रेमात पडतात. काही काळानंतर त्यांचे संबंध बिघडतात. यामुळे निराश झालेली शायना आपल्या वडिलांकडे पोलंडला जाते. पण देवीवरचे तिचे प्रेम मात्र कायम असते. वडील तिची समजूत घालतात आणि दुस:या मुलाशी लग्न करण्याचे सुचवतात. त्यांनी सुचवलेला मुलगा हिमांशू (रणदीप हुडा) दिल्लीत पोलीस अधिकारी असतो. त्याला भेटण्यास ती तयार होते. हिमांशू एका महत्त्वाच्या कामगिरीसाठी पोलंडला आलेला असतो. त्यामुळे तेथेच शायना आणि हिमांशूची भेट होते. यादरम्यान दोघांनाही आपल्या आयुष्यात घडलेल्या जुन्या गोष्टीही आठवतात. शायनाला एकदम देवीच्या ज्या गुणावर भाळलो होतो ते सगळे आठवते. तर हिमांशूला दिल्लीतल्या डेव्हिल या चोराची आठवण होते. हा महारथी पोलिसांना आधीच कल्पना देऊन चोरी करतो आणि त्यात पोलिसांना चकवा देत राहतो. त्याचे मोठे आव्हानच असते. खरे तर हिमांशू डेव्हिलचा पाठलाग करत पोलंडला आलेला असतो. पोलंडमध्येही त्यांच्यात चोर-पोलीसचा खेळ सुरू होतो. तर शायना आणि देवी यांची पुन्हा भेट होते. एका वळणावर हिमांशूला डेव्हिलचे खरे नाव कळते. तो देवीलालच असतो. एका छोटय़ा मुलीचे आयुष्य वाचवण्यासाठी त्याने चोराचे रूप घेतलेले असते. अनेक गरीब मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तो चो:या करत असल्याचेही कळते. पोलंडमध्येही देवीलाल आपली मोहीम फत्ते करतो आणि पोलिसांना पुन्हा गुंगारा देतो. दिल्लीला परतल्यावर डेव्हिल पोलिसांना पुन्हा आव्हान देत एक मोठी चोरी करतो. अनेकदा चकवा देत देत डेव्हिल शेवटी हिमांशूला एक वेगळेच सरप्राइज देतो.
वैशिष्टय़े - सलमानला डोळ्यासमोर ठेवून केलेला हा संपूर्ण मसालेदार चित्रपट आहे. चित्रपटासाठी आवश्यक असलेली कोणतीही गोष्ट सुटू नये याची पुरेपूर काळजी घेतल्याने त्याच्या चाहत्यांना चित्रपट नक्की आवडेल. चित्रपटाचे प्रमुख आकर्षण त्यातली साहसदृश्ये आहेत. पोलंडमध्ये घडलेली साहसदृश्ये तर हॉलीवूड चित्रपटांच्या तोडीची आहेत. यातले संवादही सलमानला डोळ्यासमोर ठेवूनच लिहिले गेले आहेत. रजत अरोराने लिहिलेले दिल मे आता हूं, समझ में नही.. असे संवाद त्याच्यासाठी चपखल बसतात. चित्रपटाचा वेगही चांगला आहे. संपूर्ण चित्रपटात खरी मजा आणतो तो सलमान. देवी आणि डेव्हिल या दोन्ही भूमिकांत त्याने जान ओतली आहे. पूर्वार्धात कॉमेडी, रोमान्स, अॅक्शन अशा प्रत्येक अंदाजात सलमान धम्माल करतो. तसेच हँगओव्हर हे त्याने गायलेले गाणोही जमले आहे. ‘जुम्मे की रात..’ सलमानची हिरोईन असल्याचा पुरेपूर फायदा ज्ॉकलीनने घेतला आहे. ग्लॅमरबरोबरच भावनिक दृश्यांमध्येही तिने मेहनत घेतल्याचे दिसते. आतार्पयतचा तिचा हा सगळ्यात चांगला अभिनय आहे. रणदीप हुडाने उत्तम अभिनय केला आहे. नवाजुद्दीन सिद्दिकीनेही छान भूमिका साकारली आहे.
साहाय्यक भूमिकांमध्ये मिथुन चक्रवर्ती, सौरभ शुक्ला, अर्चना पुरणसिंग, संजय मिश्र, विपिन शर्मा आणि शुमोना यांनीही चांगला अभिनय केला आहे. तांत्रिकदृष्टय़ा चित्रपट परिपूर्ण करण्यासाठी सिनेमॅटोग्राफर बोस, अॅक्शन मास्टर अनल अरासू आणि नृ्त्यदिग्दर्शक अहमद खान यांनी उत्कृष्ट काम केले आहे.
उणिवा : सलमानच्या प्रत्येक चित्रपटात असणारी कथेची उणीव याही चित्रपटात आहे. एका तेलगू चित्रपटाचा नावासह रिमेक असलेल्या या चित्रपटात तसे नावीन्य काहीच नाही. पोलंड आणि दिल्लीमधील दृश्यांमध्ये अनेकदा गोंधळ उडतो. पूर्वार्धातली दृश्येही खूप लांबलचक आहेत. तसेच पहिल्यांदाच दिग्दर्शनात उतरलेल्या साजिद नाडियादवालाचे चित्रपटावर नियंत्रण नसल्याचेही जाणवते. दिग्दर्शकापेक्षा तो अॅक्शन मास्टर आणि नृत्यदिग्दर्शकाचाच चित्रपट जास्त वाटतो.