देशातील हा एकमेवर चित्रपट, रिलीजपूर्वीच कमावले होते 100 कोटी; पठान, आदिपुरुष जवळपासही नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 18:11 IST2023-06-18T18:09:09+5:302023-06-18T18:11:14+5:30

या चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच 100 कोटी रुपयांची कमाई केली होती. अशी कामगिरी करणारा हा देशातील एकमेव चित्रपट आहे.

mohanlal marakkar lion of the arabian sea The only film in the country to earn 100 crores before its release through advance booking | देशातील हा एकमेवर चित्रपट, रिलीजपूर्वीच कमावले होते 100 कोटी; पठान, आदिपुरुष जवळपासही नाही!

देशातील हा एकमेवर चित्रपट, रिलीजपूर्वीच कमावले होते 100 कोटी; पठान, आदिपुरुष जवळपासही नाही!

साऊथ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार मोहनलाल आपल्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध आहेत. 63 वर्षांचे मोहनलाल आजही इंडस्ट्रीमध्ये सक्रीय आहेत आणि एकाचडी एक बीग बजेट चित्रपट तयार करत आहेत. त्यांच्या नावावर एक असा विक्रम आहे, जो अद्यापपर्यंत कोणत्याही चित्रपटाला तोडता आलेला नाही. मोहनलाल यांचा ‘मरक्कर: द लायन ऑफ द अरेबियन सी’ (Marakkar: Lion of the Arabian Sea) या चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच 100 कोटी रुपयांची कमाई केली होती. अशी कामगिरी करणारा हा देशातील एकमेव चित्रपट आहे.

मोहनलाल यांचा चित्रपट ‘'मरक्कर: द लायन ऑफ द अरेबियन सी' हा 2021 मध्ये रिलीज झाला होता. त्यांनी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये येण्यापूर्वीच, ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत, अ‍ॅडव्हान्स तिकिट बुकिंगच्या माध्यमाने 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारा ‘मरक्कर: द लायन ऑफ अरेबियन सी’ हा देशातील पहिला चित्रपट असल्याचे म्हटले होते.

कमाईच्या बाबतीत हे तगडे चित्रपट जवळपासही नाहीत -
अशा प्रकारे मोहनलाल यांच्या हा चित्रपटापुढे एसएस राजामौली यांचा ‘आरआरआर’, शाहरुख खानचा ‘पठान’, प्रभासचा ‘आदिपुरुष’ आणि ‘पोन्नियिन सेल्वन 2’ सारखे चित्रपटही कुठेच नाहीत. बॉक्स ऑफिसवर जबरदस्त चालणारे हे चित्रपट अ‍ॅडव्हन्स बुकिंगमध्ये एवढी कमाई करू शकले नव्हते. मात्र रिलीजनंतर या सर्व चित्रपटांनी छप्पर फाड कमाई केली होती. भारतात 500 कोटी रुपयांहून अधिकची कमाई करण्याचा विक्रम आपल्या नावे करणारा शाहरुख खानचा ‘पठान’हा पहिला हिंदी चित्रपट आहे.

सर्वात महागडा मल्याळम चित्रपट होता मरक्कर -
'मराक्कर: द लायन ऑफ द अरेबियन सी' हा 16व्या शतकाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेला एक पीरियड ड्रामा चित्रपट आहे. प्रियदर्शन दिग्दर्शित मारक्कर हा सर्वात महागडा मल्याळम चित्रपट आहे. यात मोहनलाल यांच्या शिवाय कीर्ती सुरेश, अर्जुन सरजा, सुनील शेट्टी, प्रणव मोहनलाल, मंजू वारियर आणि मुकेश सारख्या स्टार्सनी काम केले होते. मात्र कमाईच्या बाबतीत हा चित्रपट फारशी कमाल दाखवू शकला नव्हता.
 

Web Title: mohanlal marakkar lion of the arabian sea The only film in the country to earn 100 crores before its release through advance booking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.