मोहंजोदडो’चे प्रदर्शन २०१६ मध्ये
By Admin | Updated: August 28, 2014 02:06 IST2014-08-28T02:06:08+5:302014-08-28T02:06:08+5:30
ऋ तिक रोशनचा बहुचर्चित ‘मोहंजोदडो’ पाहण्यासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मोहंजोदडो’चे प्रदर्शन २०१६ मध्ये
ऋ तिक रोशनचा बहुचर्चित ‘मोहंजोदडो’ पाहण्यासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे. हा चित्रपट २२ जानेवारी २०१६ ला रिलीज होणार आहे. सूत्रांनुसार ऋतिक रोशन या चित्रपटासाठी विक्रमी ५० कोटी रुपये एवढी मोठी फी घेणार आहे. या चित्रपटाचे सेटस् आणि शूटिंगवरही बराच खर्च होणार असल्याचा अंदाज आहे. एवढेच नव्हे, तर यू टीव्ही फिल्मस्ने चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्यापूर्वीच चित्रपटाचे सॅटेलाईट राईटस् १२५ कोटींमध्ये खरेदी केले आहेत. ऋतिकसोबत पूजा हेगडे आहे. पूजाचा हा पहिलाच हिंदी चित्रपट असेल. शूटिंग दक्षिण आफ्रिकेत आॅक्टोबर महिन्यात सुरू होणार आहे.