'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 09:30 IST2025-11-13T09:29:01+5:302025-11-13T09:30:19+5:30
अभिनेता आमिर खानच्या '३ इडियट्स' चित्रपटातील 'मिलीमीटर'ची भूमिका साकारलेला मुलगा आठवतोय का? हे पात्र राहुल कुमारने साकारले होते आणि आता १६ वर्षांनंतर तो नुकताच दिल्लीच्या रस्त्यावर दिसला, तेव्हा त्याला ओळखणे कठीण झाले आहे.

'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
'३ इडियट्स'मध्ये राहुल कुमारने 'मिलीमीटर'ची भूमिका साकारली होती. त्याने कॉलेज कॅम्पसमध्ये रँचो आणि त्याच्या मित्रांना खूप मदत केली होती. ही भूमिका इतकी गाजली की आजही लोक त्याला 'मिलीमीटर' याच नावाने ओळखतात. नुकताच नवी दिल्लीत एका पोर्ट्रेट फोटोग्राफरने राहुल कुमारला पाहिले. पण तीही त्याला ओळखू शकली नाही. राहुलच्या पत्नीने सांगितल्यावर तिने त्याला ओळखले.
राहुल कुमारचे लग्न झाले असून तो आपल्या तुर्कीश पत्नीसोबत होता. फोटोग्राफरने आपले ओळख करून दिली आणि राहुल व त्याच्या पत्नीचा पोर्ट्रेट फोटो क्लिक करण्याची परवानगी विचारली. राहुलने यासाठी होकार दिला. जेव्हा फोटोग्राफरने त्यांची नावे विचारली, तेव्हा राहुल कुमारने सांगितले, "मी राहुल आहे. ही माझी पत्नी केझिबान दोगान आहे आणि ती तुर्कीची आहे." त्यांचे लग्न झाले आहे का, असे विचारल्यावर त्याच्या पत्नीने सांगितले, "हो, आमचे लग्न झाले आहे, ४ मे रोजी." त्यांची भेट कशी झाली, असे विचारल्यावर राहुलच्या पत्नीने सांगितले की, '३ इडियट्स' पाहिल्यानंतर ती पहिल्यांदा राहुलला भेटली होती.
— jyoti singh (@jyotisingh24061) November 12, 2025
पत्नीने १४ वर्षांपूर्वी राहुलला केला होता मेसेज
राहुलची पत्नी म्हणाली, "मी हा चित्रपट '३ इडियट्स' पाहिला, ज्यात त्याने एक भूमिका केली आहे. 'मिलीमीटर'चे पात्र, माहिती आहे ना? मी त्याला मेसेज केला आणि आम्ही बोलू लागलो. मला वाटते ही गोष्ट १४ वर्षांपूर्वीची आहे."
सध्या राहुल कुमार काय करतो?
राहुल कुमार सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहे. तो नुकताच 'बंदिश बँडिट्स' नावाच्या वेबसीरीजमध्ये दिसला होता. '३ इडियट्स'नंतर त्याने अनेक प्रोजेक्ट्समध्ये काम केले. त्याने 'यम हैं हम', 'नीली छतरी वाले' आणि 'फिर भी ना माने- बदतमीज दिल' यांसारख्या मालिकांमध्येही काम केले.