मिलिंद सोमणला मराठी शिकविणारा नागरिक!
By Admin | Updated: June 10, 2015 23:19 IST2015-06-10T23:19:04+5:302015-06-10T23:19:04+5:30
शिवाजी पार्कचा मराठी छोकरा आणि मराठी येत नाही असे सांगितले तर कोणाचा विश्वास बसणार नाही ना? पण हे खरं आहे. गंध, संहिता इत्यादी मराठी चित्रपटांमध्ये

मिलिंद सोमणला मराठी शिकविणारा नागरिक!
शिवाजी पार्कचा मराठी छोकरा आणि मराठी येत नाही असे सांगितले तर कोणाचा विश्वास बसणार नाही ना? पण हे खरं आहे. गंध, संहिता इत्यादी मराठी चित्रपटांमध्ये काम केल्यानंतरही मिलिंदसाठी नागरिकचे संवाद कठीणच होते. यासाठी मिलिंद चक्क मराठी शिकला. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान तो सहकलावंत व तंत्रज्ञांसोबत मराठीचा सराव करीत होता. आपल्याला उत्कृष्ट संवाद बोलता येत नाही, याचे शल्य न बाळगता त्याने मराठी
शिकून आपल्या भूमिकेला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न करून आपल्या कामात कोणताही अडथळा येऊ दिला नाही. यालाच कसदार अभिनेता म्हणतात.