एकमेकांच्या विरोधात बोलणाऱ्यांची आता युती त्यामुळे..; मिलिंद गवळींची राजकारणावर खरमरीत पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 03:22 PM2024-05-17T15:22:05+5:302024-05-17T15:24:24+5:30

मिलिंद गवळींनी सध्याचं राजकारण आणि पुढाऱ्यांच्या व्हायरल होणाऱ्या क्लिप्स यावर भाष्य करणारी खरमरीत पोस्ट केलीय (milind gawali, aai kuthe kay karte)

milind gawali post for loksabha election 2024 and politician who active in politics | एकमेकांच्या विरोधात बोलणाऱ्यांची आता युती त्यामुळे..; मिलिंद गवळींची राजकारणावर खरमरीत पोस्ट

एकमेकांच्या विरोधात बोलणाऱ्यांची आता युती त्यामुळे..; मिलिंद गवळींची राजकारणावर खरमरीत पोस्ट

मिलिंद गवळींनी सोशल मीडियावर सध्याचं राजकारण  आणि व्हायरल होणाऱ्या क्लिप्स यावर भाष्य केलंय. मिलिंद गवळी लिहितात, “डोक्याचा भुगा” आजच्या तारखेला सगळ्यात फसव काय असेल तर सोशल मीडिया, त्यावर असलेल्या बातम्या, गोष्टी किती खऱ्या किती खोट्या आहेत हे तर परमेश्वरालाच माहित असतील,
आता इलेक्शन असल्यामुळे पुढार्‍यांची भाषणांचे क्लिपिंग तर खूपच पसरलेले आहेत."

मिलिंद गवळी पुढे लिहितात, "एखादा पुढारी दुसऱ्या एखाद्या पुढार्‍याच्या विरोधात बोलतो अशी क्लिप बघायला मिळते, पण मग प्रश्न पडतो त्यांची युती आहे मग त्या पुढाऱ्याच्या विरोधात का बोलला असेल ? मग नंतर लक्षात येते की त्या पुढार्‍याची ती क्लिप फार जुनी आहे, ज्या वेळेला ते एकमेकांच्या विरोधात होते तेव्हा ची , पण आता मात्र त्यांची युती आहे,आता ते एकमेकांचं कौतुक करता आहेत, काय खरं काय खोटं हे कळायलाच मार्ग नाही. इंस्टाग्राम आणि फेसबुक किंवा युट्युब च्या क्लिपिंग बघायला सुरुवात केली की त्या संपतच नाहीत, तुमचा अर्धा पाऊण तास कसा निघून गेला ते तुम्हाला कळतच नाही, आणि महत्त्वाचं म्हणजे इतके clippings आणि visuals डोळ्यापुढून जात असतात की डोक्याचा भुगाच होतो."

मिलिंद गवळी पुढे लिहितात "बरं इतका वेळ आपण काय बघितलं, काय पाहिलं तर ते काय आपल्या काही लक्षात राहत नसतं, कुठल्यातरी गाण्याची धून किंवा त्या गाण्याची पहिली ओळ मात्र डोक्यात फिरत असते, गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, किंवा पुष्पा पुष्पा पुष्पा किंवा एखादं जुनं रिमिक्स गाणं जरा देखो सजन बेईमान भवरा कैसे गुणगुणये. आता मी हे का सांगतोय तर हे जे फोटोशूट चे फोटोज मी post केले आहे ते , ते विशालजींनी काढलेले आहेत त्यांच्या वाकोल्याच्या स्टुडिओमध्ये."


मिलिंद गवळी शेवटी लिहितात, "विशालजींनी माझे असे छान फोटो काढले, ते फोटोज काढत असताना त्यांना सुद्धा कल्पना नसेल, आणि हे फोटो बघून कोणालाही कल्पना येणार नाही की त्या दिवशी माझ्या डोक्याचा किती भुगा झाला होता, स्टुडिओत जाण्याच्या आधी एका Office मध्ये अर्ध्या तासाचे जिथे काम होतं तिथे चार तास लागले होते, ठाणे ते वाकोला अतिशय ट्राफिक मधून, चाळीस डिग्री सेल्सिअस मधून घामाघुन होऊन स्टुडिओत पोहोचलो होतो, पाऊण तासात फोटोशूट करून ज्या वेळेला परत निघालो त्तेव्हा वादळ आलं, माझ्या गाडीसमोर असंख्य झाड पडली, ट्रॅफिक जॅम, रिक्षातून मोटरसायकल स्कूटर वर न जाणाऱ्या लोकांचे अतिशय हाल, स्कूटर बाजूला लावून आडोशाला भिजलेले असंख्य लोक, पण माझे फोटो बघून कोणाला वाटणार नाही की हा इतका त्रासला होता. पण मग असे विचार येतो मनात की आपण त्रासलेलो आहोत हे लोकांना काय दाखवायचं. इतरांच्या फोटोच्या मागच्या कहाण्या काय फार वेगळ्या नाही आहेत, जीना इसी का नाम है."

Web Title: milind gawali post for loksabha election 2024 and politician who active in politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.