मेघा गुप्ताला या गोष्टींचा मोह आवरेना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 13:16 IST2017-10-16T07:46:42+5:302017-10-16T13:16:42+5:30

मेघा गुप्ताला या गोष्टींचा मोह आवरेना!
सिनेमा असो किंवा मालिका कलाकारांना ग्लॅमरच्या दुनियेत आपल्या कामाबरोबरच स्वतःच्या फिटनसवरही तितकेच मेहनत घेताना दिसतात.सुंद दिसावे यासाठी खास डाएटनुसार ही कलाकार मंडळी आपला आहार घेत असतात. साठी नेहमीच कॉंशियस असलेले कलाकारांनाही कधी कधी आपला मोह आवरता येत नाही. अशीच काहीशी परिस्थीत सध्या टीव्ही अभिनेत्री मेघा गुप्ताची झाली आहे.‘आयुष्यमान भव’ या मालिकेत मेघा गुप्ता समायरा ही भूमिका साकारत आहे. मुळात तिला खूप खाण्याची आवड आहे. ती सगळ्या प्रकारचे पदार्थ आणि जेवण जेवायला आवडते. मेघा इतर अभिनेत्रींप्रमाणे डाएट साठी नेहमीच कॉंशियस आहे.मात्र जेव्हा तिला भूक लागते तेव्हा मिळेल ते पदार्थ खाणे ती पसंत करते.मालिकेच्या शूटिंगमुळे तिला बाहेर जाऊन जंक फुड खाता येत नसले तरीही सेटवर ती आपल्याबरोबर नेहमी फास्ट फूड घेऊन येते आणि तिला ते खाल्ल्याशिवाय राहवत नाही.
विशेषत: सामोसाला नकार देणा-यांपैकी ती नक्कीच एक नाही. सेटवरील प्रत्येकाला तिची खाण्याची आवड माहिती असून ती बरेचदा सामोसा आणि पाणी पुरी यावर ताव मारताना दिसते.यासंदर्भात मेघाला विचारले असता ती म्हणाली, “मी चांगली खवय्यी असून मी अन्नाला कधीच नकार देत नाही. मला समोसे,वडापाव या सगळे पदार्थ खायला खूप आवडतात. त्यामुळे डाएट फक्त मनाला समजवण्यासाठी करते बाकी मी जास्त डाएट कॉंशियस नाही असे मला वाटते. माझ्या समोर कोणी खाण्याच्या गोष्टींवर चर्चा करत असेन जिभेला पाणी सुटतं.ते पदार्थ जोपर्यंत खात नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसत नाही. मला खाण्याची आवड आहे म्हणून मला उत्तम जेवणही बनवता येते असे मेघाने सांगितले.
तसेच सध्या दिवाळी आहे मग काय, दिवाळीत शॉपिंगबरोबर फराळाचीही धूम असते. फराळ बनवण्यापासून सगळ्याच गोष्टी लगबग घरात सुरू असते. एकदा काय फराळ बनून तयार झाला की, मग आम्ही सर्व कुटुंबियांसह त्यांवर ताव मारतो आणि यावेळी डाएट सगळ्या गोष्टी विसरून मनसोक्त फराळाचा मनमुराद आनंद लुटत असल्याचेही मेघाने सांगितेलें.