लग्नघटिका एक महिन्यावर
By Admin | Updated: December 24, 2015 01:20 IST2015-12-24T01:20:07+5:302015-12-24T01:20:07+5:30
बॉ लीवूड अभिनेत्री असिन तिचा बॉयफ्रेंड सेल्यूलर टायकून राहुल शर्मासोबत पुढील महिन्यात विवाहाच्या नाजूक बंधनात अडकणार आहे

लग्नघटिका एक महिन्यावर
बॉ लीवूड अभिनेत्री असिन तिचा बॉयफ्रेंड सेल्यूलर टायकून राहुल शर्मासोबत पुढील महिन्यात विवाहाच्या नाजूक बंधनात अडकणार आहे. लग्न दिल्लीत होणार असून एकदम फिल्मी स्टाईलने मुंबईत त्याची प्लॅनिंग सुरू आहे. गोल्डन कलरचे सुंदर वेडिंग कार्ड तयार असून सर्व गेस्ट्सना देण्यात येतील. आता अवघ्या एका महिन्यावर लग्नघटिका येऊन ठेपली असून विवाहसंदर्भातील सर्व तयारीला वेग आला आहे. बॉलीवूडमधील सर्व जण या तयारीस दाद देतील, अशी तयारी सुरू आहे.