लग्नाचे ओझे...!
By Admin | Updated: July 25, 2015 02:43 IST2015-07-25T02:43:37+5:302015-07-25T02:43:37+5:30
‘मुंबई-पुणे-मुंबई’मध्ये स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे यांनी अनेक गमतीजमती केल्या. रुसवा-फुगवा ते प्रेमापर्यंत गाडी गेली; पण मुक्ता ट्रेनने निघून गेली

लग्नाचे ओझे...!
‘मुंबई-पुणे-मुंबई’मध्ये स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे यांनी अनेक गमतीजमती केल्या. रुसवा-फुगवा ते प्रेमापर्यंत गाडी गेली; पण मुक्ता ट्रेनने निघून गेली. त्यामुळे पुढे काही कळेना. आता त्याचा सिक्वल येणार आहे. ‘लग्नाला यायचं हं’ अशी टॅगलाइन या चित्रपटाची आहे. त्यामुळे स्वप्निल-मुक्ताच्या प्रेमाचा प्रवास लग्नापर्यंत पोहोचणार, असे दिसतेय. लग्नाचे हे ओझे आता त्यांच्या अंगावर पडणार. त्यामुळेच जणू स्वप्निल ओझे उचलण्याची प्रॅक्टिस करतोय जणू.
चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणतात, ‘खूप दिवसांपासून रखडलेले लग्न अखेर या दिवाळीत लागणार आहे. स्वप्ने प्रत्यक्षात उतरणार आहेत. चित्रपटाचे निर्माते अमित भानुशाली यांनी सोशल मीडियावर सांगितले की, ‘काही कथांचा सिक्वेल येणे गरजेचेच असते. खऱ्याखुऱ्या प्रेमकथेला कधीच आनंदी शेवट नसतो. कारण त्या कधीच संपत नाहीत, असे म्हणतात.. त्यामुळे ‘मुंबई-पुणे-मुंबई’चा सिक्वेल येणे गरजेचे होते.