बॉलीवूडमध्ये मराठी पाऊल
By Admin | Updated: November 22, 2014 01:47 IST2014-11-22T01:47:02+5:302014-11-22T01:47:02+5:30
संजय भन्साळी यांच्या आगामी बहुचर्चित ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमात मराठी अभिनेत्री सुखदा खांडकेकर

बॉलीवूडमध्ये मराठी पाऊल
संजय भन्साळी यांच्या आगामी बहुचर्चित ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमात मराठी अभिनेत्री सुखदा खांडकेकर आणि अनुजा गोखले झळकणार असून दोघीही बाजीरावांच्या बहिणी असलेल्या अनुबाई आणि भिऊबाई या व्यक्तिरेखा साकारणार आहेत. अभिनेता रणवीर सिंह यात बाजीरावाची तर दीपिका सौंदर्यवती मस्तानीची भूमिका साकारणार आहे. या सिनेमातून पेशवा बाजीराव आणि सौदर्यवती मस्तानी यांची प्रेमकथा अतिशय रंजकपणे पडद्यावर उलगडणार आहे. 'खामोशी', 'हम दिल दे चुके सनम', 'देवदास', 'सावरिया', 'राम लीला' यांसारख्या एकाहून एक सरस कलाकृती करणा?्या संजय भन्साळी यांचा दिग्दशर्नाचा अनुभव लक्षात घेता 'बाजीराव मस्तानी' हा सिनेमा भव्य-दिव्यतेत कुठेही कमी ठरणार नाही यात शंका नाही.