आंतरराष्ट्रीय पडद्यावर मराठीमोळी देविका भिसे
By Admin | Updated: April 16, 2016 01:54 IST2016-04-16T01:54:35+5:302016-04-16T01:54:35+5:30
मराठी अभिनेत्री यशाची नवनवीन शिखरे चढत आहेत. याचा आनंद नक्कीच आहे आणि आता याच आनंदाला द्विगुणित करण्यास एका मराठी मुलीने मोलाचा हातभार लावला आहे.

आंतरराष्ट्रीय पडद्यावर मराठीमोळी देविका भिसे
मराठी अभिनेत्री यशाची नवनवीन शिखरे चढत आहेत. याचा आनंद नक्कीच आहे आणि आता याच आनंदाला द्विगुणित करण्यास एका मराठी मुलीने मोलाचा हातभार लावला आहे. ही मुलगी आहे देविका भिसे. भारतीय वंशाची अमेरिकन अभिनेत्री ‘द मॅन हू न्यू इन्फिनिटी हॉलीवूड’ चित्रपटात दिसणार आहे. सध्या भारतीय संस्कृती आणि इतिहासात हॉलीवूडकर रमू लागले आहेत. आता ‘द मॅन हू न्यू इन्फिनिटी’ या चित्रपटातून श्रीनिवास रामानुजन यांचे आयुष्य आंतरराष्ट्रीय पडद्यावर घेऊन येत आहेत. मराठमोळी देविका भिसे ही रामानुजन यांच्या पत्नीची भूमिका साकारणार असून रामानुजन यांच्या भूमिकेत देव पटेल आहेत.
देविकाचा हा पहिला ब्रेक तोही इतका
मोठा. तामिळनाडूमध्ये स्थायिक
असलेली जानकीची भूमिका ती साकारतेय. देविकाने हे पात्र साकारताना अॅक्सेंट न वापरता इंग्रजी संवाद बोलले आहेत. कारण रामानुजन
आणि त्यांची पत्नी इंग्रजीत एकमेकांशी संवाद साधत नसत, हे भान ठेवूनच देविकाने अॅक्सेंट वगळूनच इंग्रजीचे संवाद म्हटले आहेत.