"कुशल बद्रिकेचे पुढचे दोन दात खोटे", दिग्दर्शकाचा खुलासा, म्हणाले, " प्रयोगादरम्यान खांबाला धडकून..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 02:08 PM2023-10-03T14:08:24+5:302023-10-03T14:08:56+5:30

मराठी दिग्दर्शकाने शेअर केला कुशल बद्रिकेचा तो प्रसंग, म्हणाले, "दात पडल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत..."

marathi director viju mane shared kushal badrike incidence said his two teeths are fake | "कुशल बद्रिकेचे पुढचे दोन दात खोटे", दिग्दर्शकाचा खुलासा, म्हणाले, " प्रयोगादरम्यान खांबाला धडकून..."

"कुशल बद्रिकेचे पुढचे दोन दात खोटे", दिग्दर्शकाचा खुलासा, म्हणाले, " प्रयोगादरम्यान खांबाला धडकून..."

googlenewsNext

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक विजू माने यांनी अनेक हिट चित्रपट सिनेसृष्टीला दिले. 'शिकारी', 'शर्यत', 'बायोस्कोप', 'पांडू', 'खेळ मांडला' हे त्यांचे गाजलेले सिनेमे. चित्रपटांबरोबरच विजू माने 'स्ट्रगलर साला' या युट्यूब सीरिजसाठी ओळखले जातात. नुकतंच एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्ट्रगलर साला सीरिजमागचा त्यांचा स्ट्रगल सांगितला. 

विजू मानेंच्या स्ट्रगलर साला या सीरिजमध्ये कुशल बद्रिके लक्ष वेधून घेताना दिसतो. अजब गजब या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत विजू मानेंनी कुशल बद्रिकेने एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, "एका स्पर्धेत मी एकांकिका बघायला गेलो होतो. कुशलची एकांकिका होती. त्याचा पहिला प्रवेश अडीच मिनिटांचा होता. या अडीच मिनिटांमध्ये कुशलने उजव्या विंगेतून एक्झिट घेतली आणि त्याला दुसऱ्या विगेंतून धावत यायचं होतं. त्याच्या खांद्यावर एक रुमाल होता. 

'जब वी मेट २'बाबत दिग्दर्शकाचा मोठा खुलासा, म्हणाले, "चित्रपटाच्या सीक्वलसाठी..."

"कुशल आला पण त्याच्या खांद्यावरील रुमाल लाल होत चालला आहे, हे माझ्या लक्षात आलं. हे प्रेक्षकांना कदाचित जाणवलं नसेल. त्या नाट्यगृहात एन्ट्री घेताना विगेंतील एका खांबाला तो आपटला. आणि त्याचे पुढचे दोन दात पडले. आताही त्याचे दोन्ही दात खोटे आहेत. त्या रक्तबंबाळ अस्थेतही त्याने खांद्यावर रुमाल घेऊन पुढची ४० मिनिटे संपूर्ण एकांकिका केली. आणि हे कोणाला कळलंही नाही. तो रुमाल पिळूनही रक्त निघत होतं. पण, तरीही त्याने प्रेक्षकांना जाणवू दिलं नाही. त्यानंतर मग मी माझ्या गोजिरी नावाच्या सिनेमात कुशलला घेतलं," असंही पुढे त्यांनी सांगितलं. 

उर्फी जावेदने गुपचूप उरकला साखरपुडा? मिस्ट्री मॅनबरोबरचे फोटो झाले व्हायरल

कुशल बद्रिकेनेही अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'चला हवा येऊ द्या'मधून तो घराघरात पोहोचला. 'जत्रा', 'पांडू', 'बापमाणूस', 'भिरकीट' अशा चित्रपटांत त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. 'रावरंभा' या सिनेमात कुशल पहिल्यांदाच ऐतिहासिक भूमिकेत दिसला होता. 

Web Title: marathi director viju mane shared kushal badrike incidence said his two teeths are fake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.