मराठी येते, पण मी बोलणार नाही! - विद्या बालन
By Admin | Updated: June 3, 2016 01:33 IST2016-06-03T01:33:37+5:302016-06-03T01:33:37+5:30
बॉलीवूडची तगडी अभिनेत्री विद्या बालन ही आता एका मराठी चित्रपटाद्वारे मराठीत पदार्पण करीत आहे. यामुळे तिची मराठी ऐकण्यास नक्कीच सर्व प्रेक्षक उत्साही असतील.

मराठी येते, पण मी बोलणार नाही! - विद्या बालन
बॉलीवूडची तगडी अभिनेत्री विद्या बालन ही आता एका मराठी चित्रपटाद्वारे मराठीत पदार्पण करीत आहे. यामुळे तिची मराठी ऐकण्यास नक्कीच सर्व प्रेक्षक उत्साही असतील. त्यामुळे नुकतेच एका म्युझिक लाँचच्या वेळी विद्याला सर्वांनी ‘मराठीत बोल,’ असा आग्रह केला. तेव्हा विद्या म्हणाली की, ‘मला मराठी येतं, पण मी मराठीत बोलणार नाही. कारण मी जर मराठीत बोलले, तर इतर अभिनेत्रींना असुरक्षित वाटेल.’ त्यानंतर विद्या हसत पुढे म्हणाली की, ‘मी मुंबई या शहरात लहानाची मोठी झाले आहे. त्यामुळे साहजिकच मराठी मला थोडं-थोडं बोलता येतं. सातवीपर्यंत मला शंभर गुणांचे मराठीदेखील होते, तसेच माझे अनेक नातेवाईक महाराष्ट्रीयन आहेत. माझा कर्मचारी वर्गदेखील मराठी आहे. मला मराठी कधीच परके वाटले नाहीत. मी मराठी चित्रपटदेखील बघते. ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपट मी पाहिलाय. त्याचे चित्रीकरण, गाणी मला फारच आवडली. मला अधूनमधून मराठी चित्रपटाबाबत विचारणा होते, पण त्यासाठी मला माझे मराठी अधिक सुधारण्याची गरज आहे. मराठी चित्रपटांसाठी मी कोणालाच माझा आवाज डब करू देणार नाही. माझे डबिंग मीच करणार.’