​झी नाट्य गौरववर संगीत देवबाभळीची मोहोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 13:44 IST2018-04-03T08:14:39+5:302018-04-03T13:44:39+5:30

मराठी रंगभूमीवर नाटक जपणारे आणि नाटक जगणारे रंगकर्मी यांच्या कामाची दखल घेत त्यांचा सन्मान करणारा सोहळा म्हणजे झी नाट्य ...

Zee Natya Gaurav Music - Godavari | ​झी नाट्य गौरववर संगीत देवबाभळीची मोहोर

​झी नाट्य गौरववर संगीत देवबाभळीची मोहोर

ाठी रंगभूमीवर नाटक जपणारे आणि नाटक जगणारे रंगकर्मी यांच्या कामाची दखल घेत त्यांचा सन्मान करणारा सोहळा म्हणजे झी नाट्य गौरव सोहळा. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा गौरव सोहळा अत्यंत दिमाखदार पद्धतीने पार पडला. व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकात कमालीची चुरस असलेल्या या सोहळ्यात कोण बाजी मारेल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यात संगीत देवबाभळी या नाटकाने बाजी मारली. 
भरत जाधव यांना वेलकम जिंदगीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर मानसी जोशी आणि शुभांगी सदावर्ते यांना संगीत देवबाभळीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तर ऋतुजा बागवे ला अनन्या या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा विशेष पुरस्कार मिळाला. या सोहळ्यात सारेगमप लिटिल चॅम्पच्या अंतिम फेरीतील गायक प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी नाट्य संगीत सादर करून बहार आणली. सोनाली कुलकर्णी आणि अनिता दाते यांनी सादर केलेली सखाराम बाईंडर मधील लक्ष्मी आणि चंपा, संजय मोने यांनी सादर केलेला तो मी नव्हेच मधील लखोबा लोखंडे तसेच डॉ. अमोल कोल्हे आणि प्रतीक्षा लोणकर यांनी सादर केलेला वि.वा. शिरवाडकर यांच्या कौंतेय मधील प्रवेश सादर करून रसिकांची मने जिंकून घेतली. 
विख्यात नाटकांचे निवडक प्रवेश, बहारदार नृत्याविष्कार आणि विनोदी प्रहसने यांनी रंगलेला हा नाट्यगौरव सोहळा येत्या ८ एप्रिलला झी मराठीवर सायंकाळी ७ वा. प्रसारित होणार आहे.

सर्वोत्कृष्ट नाटक - संगीत देवबाभळी 
सर्वोत्कृष्ट लेखक - प्राजक्त देशमुख (संगीत देवबाभळी) 
सर्वोत्कृष्ट अभिनेता -  भरत जाधव  (वेलकम जिंदगी)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - मानसी जोशी आणि शुभांगी सदावर्ते (संगीत देवबाभळी)
सर्वोत्कृष्ट नेपथ्य - संदेश बेंद्रे (अनन्या)
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना - रवी आणि रसिक (युगान्त)
सर्वोत्कृष्ट संगीत - आनंद ओक (संगीत देवबाभळी)
सर्वोत्कृष्ट वेशभूषा - चैत्राली डोंगरे (वेलकम जिंदगी)
सर्वोत्कृष्ट रंगभूषा - शरद सावंत (अनन्या)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - शिवानी रांगोळे (वेलकम जिंदगी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - गिरीश ओक (वेलकम जिंदगी)
सर्वोत्कृष्ट विनोदी नाटक - ९ कोटी ५७ लाख
सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता - आनंद इंगळे (९ कोटी ५७ लाख)
सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री - वनिता खरात (हम पांच)
विशेष पुरस्कार - ऋतुजा बागवे (अनन्या)

Web Title: Zee Natya Gaurav Music - Godavari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.