झपाटलेला @30: कुबड्या खविस साकारणारा अभिनेता आहे तरी कोण?, जाणून घ्या त्याच्याबद्दलच्या या खास गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 07:54 PM2023-04-17T19:54:29+5:302023-04-17T19:55:04+5:30

Zapatlela : महेश कोठारे दिग्दर्शित झपाटलेला चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील लक्ष्या, महेश, तात्या विंचू, बाबा चमत्कार या पात्रांसोबतच कुबड्या खविस हे पात्र देखील चांगलेच लोकप्रिय झाले होते.

Zapatlela @30: Who Is The Actor Who Plays Hunchback Khavis?, Know These Special Facts About Him | झपाटलेला @30: कुबड्या खविस साकारणारा अभिनेता आहे तरी कोण?, जाणून घ्या त्याच्याबद्दलच्या या खास गोष्टी

झपाटलेला @30: कुबड्या खविस साकारणारा अभिनेता आहे तरी कोण?, जाणून घ्या त्याच्याबद्दलच्या या खास गोष्टी

googlenewsNext

नव्वदचा दशक मराठी चित्रपटांसाठी सुवर्ण काळ मानला जातो. महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, अशोक सराफ या अभिनेत्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी सिनेइंडस्ट्री गाजवली. महेश कोठारे यांचे अनेक चित्रपट नव्वदच्या दशकात सुपरहिट ठरले होते. महेश कोठारे दिग्दर्शित झपाटलेला सिनेमा चांगलाच गाजला होता. इतकेच नाही तर या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून कायम आहेत. या चित्रपटातील लक्ष्या, महेश, तात्या विंचू, बाबा चमत्कार या पात्रांसोबतच कुबड्या खविस ही भूमिका देखील चांगलेच लोकप्रिय झाले होते.

कुबड्या खविसची भूमिका बिपीन वर्टी यांनी साकारली होती. विशेष म्हणजे या कलाकाराने माझा छकुला सिनेमात गिधाड गॅंग मधला प्रमुख व्हिलन साकारला होता. बिपीन वर्टी यांना तुम्ही महेश कोठारेच्या अनेक चित्रपटांत पाहिले आहे. अगदी हट्टाकट्टा दिसणारा हा कलाकार वेगळ्या गेटअप मुळे अजिबात ओळखू येत नाही.

माझा छकुला, झपाटलेला चित्रपटाव्यतिरिक्त आमच्यासारखे आम्हीच, अशी ही बनवाबनवी, एक गाडी बाकी अनाडी, फेका फेकी, धुमधडाका, गंमत जंमत सारख्या अनेक मराठी चित्रपटातून अभिनय साकारला आहे. फेका फेकी, एक गाडी बाकी अनाडी, डॉक्टर डॉक्टर या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. 

आज बिपीन वर्टी हयात नसले तरी त्यांनी साकारलेल्या अशा अनेक भूमिका अजरामर झालेल्या पाहायला मिळतात. जोवर ते हयात होते तोवर जवळपास सर्वच चित्रपटांत त्यांनी महेश कोठारेंना साथ दिली होती. झपाटलेला मध्ये कुबड्या खविस म्हणून ते परिचित आहेच आणि इकडे गिधाड बनून त्याने चांगलाच धुमाकूळ घातला होता. 

Web Title: Zapatlela @30: Who Is The Actor Who Plays Hunchback Khavis?, Know These Special Facts About Him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.