"या इवलुश्या जिवाला...", रिंकू राजगुरुची 'झिम्मा २'तील सहकलाकारांसाठी खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 11:47 AM2023-12-01T11:47:07+5:302023-12-01T11:47:18+5:30

Jhimma 2 : हेमंत ढोमे दिग्दर्शित झिम्मा २ चित्रपट नुकताच रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. दरम्यान आता अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने सोशल मीडियावर झिम्मा २मधील कलाकारांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

"Ya Evalushya Jiwala...", Rinku Rajguru's special post for his Jhimma 2 co-stars | "या इवलुश्या जिवाला...", रिंकू राजगुरुची 'झिम्मा २'तील सहकलाकारांसाठी खास पोस्ट

"या इवलुश्या जिवाला...", रिंकू राजगुरुची 'झिम्मा २'तील सहकलाकारांसाठी खास पोस्ट

हेमंत ढोमे (Hemant Dhome) दिग्दर्शित 'झिम्मा २' (Jhimma 2) चित्रपट नुकताच रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकु राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दरम्यान आता अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) हिने सोशल मीडियावर झिम्मा २मधील कलाकारांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

रिंकू राजगुरू हिने इंस्टाग्रामवर झिम्मा २ चित्रपटातील फोटो शेअर करत लिहिले की, काय बोलु मी या यांच्याबद्दल,या प्रवासात मी नविन आहे असं मला आजवर कधी जाणवलं नाही. या सगळ्यांसमोर मी आपली इवलुशी,पण या इवलुश्या जिवाला या सगळ्यांनी अगदी अलगदपणे सामावून घेतलं आपलस केलं. तुम्हा सर्वांकडुन खुप शिकले या प्रवासात.खुप सुंदर गोष्टी अनुभवायला मिळाल्या.या सगळ्यासाठी सगळ्यांना खुप खुप थॅंक्यु.खुप प्रेम. @hemantdhome21 दादा थॅंक्यु तू मला ही संधी दिलीस……….UNO UNO UNO!!! #jhimma2

झिम्मा २ला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.  प्रेक्षकांसोबतच आयपीएस ऑफिसर विश्वास नांगरे पाटील, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, सोनाली कुलकर्णी, आदेश बांदेकर, अमेय वाघ, अकुश चौधरी, अभिजीत खांडकेकर, आनंद इंगळे, ललित प्रभाकर, प्रियदर्शन जाधव अशा अनेक कलाकारांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. तिकीटबारीवरही झिम्मा २ने दमदार कामगिरी केली आहे. आतापर्यंतचा बॉक्स ऑफिसचा आकडा पाहता ‘झिम्मा २’ हा लवकरच ‘झिम्मा’चा रेकॉर्ड ब्रेक करणार असे दिसत आहे. या चित्रपटाने सात दिवसांत जळपास ७.७१ कोटींची कमाई केली आहे.

Web Title: "Ya Evalushya Jiwala...", Rinku Rajguru's special post for his Jhimma 2 co-stars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.