पसंत आहे मुलगी प्रेक्षकांचा निरोप घेणार का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2016 12:09 IST2016-08-03T06:39:23+5:302016-08-03T12:09:23+5:30
२२ ऑगस्टपासून झी मराठी वाहिनीवर एका नवीन मालिकेचं आगमन होत आहे. माझा नवरा, माझी बायको, माझी मुलं असं आपण ...

पसंत आहे मुलगी प्रेक्षकांचा निरोप घेणार का?
झी मराठी वाहिनीवर २२ ऑगस्टपासून ‘माझ्या नव-याची बायको’ ही नवी मालिका सुरु होत आहे. सुभेदार कुटुंबाची ही गोष्ट आहे. सध्या या कुटुंबातील मुलगा अथर्व गुरुनाथ सुभेदार, वडील गुरुनाथ रत्नाकर सुभेदार, आई राधिका गुरुनाथ सुभेदार आणि घरातला पुरुष गुरुनाथची (दुसरी) बायको अशी ओळख या मालिकेने केली आहे.
या मालिकेची छोटीशी झलक पाहता या मालिकेचा विषय मनोरंजक आणि हलका-फुलका असावा याची कल्पना येते. या मालिकेतील पात्रांची नावं सांगण्यात आली आहेत मात्र त्यांचे चेहरे अजून दाखवण्यात आलेले नाही. ‘माझ्या नव-याची बायको’ ही मालिका ८ वाजता सुरु होणार म्हणजे 'पसंत आहे मुलगी' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार.
नवीन आशय असलेली ही मालिका २२ ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता झी मराठी वाहिनीवर सुरु होत आहे.