रवी जाधव शोधणार नवीन चेहरा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2016 16:43 IST2016-12-17T16:43:54+5:302016-12-17T16:43:54+5:30

सध्या मराठी इंडस्ट्री यशाच्या उंच शिखरावर पोहोचली आहे. या चित्रपटसृष्ट्रीत अनेक नवीन चेहरे येण्यास उत्सुक असल्याचे आपल्याला पाहायला मिळत ...

Will Ravi Jadhav find new face? | रवी जाधव शोधणार नवीन चेहरा?

रवी जाधव शोधणार नवीन चेहरा?

्या मराठी इंडस्ट्री यशाच्या उंच शिखरावर पोहोचली आहे. या चित्रपटसृष्ट्रीत अनेक नवीन चेहरे येण्यास उत्सुक असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. यासाठी हे नवोदित कलाकार जोरदार प्ऱयत्नदेखील करत असल्याचे दिसत आहेत. महाविदयालयात अनेक नाटकांच्या स्पर्धेमध्ये भाग घेणे. त्याचबरोबर विविध ठिकाणी जाऊन आॅडिशन देणे असे कोणत्या ना कोणत्या पध्दतीने हे नवोदित कलाकार जीव तोडून या चंदेरी दुनियेत येण्याचा प्ऱयत्न करत असतात. या नवोदित चेहºयाप्रमाणेच मराठी चित्रपटसृष्ट्रीतील दिग्दर्शकदेखील आपल्या आगामी चित्रपटांसाठी नवीन चेहरा शोधण्याचा जोरधार प्रयत्न करत असतात. आता हेच पाहा ना, प्रेक्षकांची लाडका दिग्दर्शक रवी जाधव यांनीदेखील थेट उंबरठा ही एकांकिका स्पर्धा पाहण्यासाठी गाठली. अशा एकांकिका पाहाण्यासाठी दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री अशा कलाकारांनजवळ वेळेदेखील नसतो. मात्र बॉलीवूड आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये आपले स्थान निर्माण करणारे दिग्दर्शक रवी जाधव यांनी उंबरठा या एकांकिकाला आवुर्जुन हजेरी लावली. त्यामुळे सध्या ते एका आगामी चित्रपटासाठी नवीन चेहरा शोधण्याच्या तयारीत असल्याचे कळत आहे. त्यामुळे रवी जाधव यांना विविध नाटकाच्या स्पर्धा पाहात आहेत. रवी जाधव यांनी आतापर्यत मराठी चित्रपटसृष्ट्रीला बालक पालक, नटरंग, अ‍ॅण्ड जरा हटके असे अनेक चित्रपट दिले आहेत. तसेच त्यांनी बँन्जो या चित्रपटानेदेखील बॉलिवूडमध्ये पदापर्ण केले आहे. त्यांच्या या चित्रपटात बॉलिवूडची तगडी अभिनेत्री नर्गिस फखरी झळकली होती. तसेच सध्या रवी जाधव शिवछत्रपती महाराज यांच्या जीवनावर आधारित असणाºया कथेवर चित्रपट करत आहे.त्याच्या या चित्रपटात प्रेक्षकांचा लाडका अभिनेता रितेश देशमुख झळकणार आहे.



Web Title: Will Ravi Jadhav find new face?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.