का आहे क्रांती सध्या आनंदात ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2016 14:11 IST2016-11-12T14:11:48+5:302016-11-12T14:11:48+5:30
प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात नेहमीच मिळणाऱ्या पहिल्या गोष्टीचे अप्रुप वाटत असते. भले तो शाळा, कॉलेजचा पहिला दिवस असो. एवढेच नाही ...
.jpg)
का आहे क्रांती सध्या आनंदात ?
्रत्येक व्यक्तीला आयुष्यात नेहमीच मिळणाऱ्या पहिल्या गोष्टीचे अप्रुप वाटत असते. भले तो शाळा, कॉलेजचा पहिला दिवस असो. एवढेच नाही तर प्रत्येक व्यक्तीला पहिल्या मोबाईल, नोकरीचेदेखील विशेष कौतुक वाटत असते. अशीच काहीशी आनंदाची गोष्ट अभिनेत्री क्रांती रेडकर हिच्याबाबतदेखील घडली आहे. नुकताच क्रांतीने पहिल्यांदाच शास्त्रीय नृत्य सादर केले. त्यामुळे क्रांती खूपच आनंदी झाली असल्याचे दिसत आहे. तिच्या या आनंदाविषयी लोकमत सीएनएक्सला क्रांती सांगते, गेली सात ते आठ वर्ष मी शास्त्रीय नृत्य शिकत आहे. त्यामुळे शास्त्रीय नृत्यावर मला कधी सादर करण्याची संधी मिळेल याची वाट पाहत होते. योगायोगाने ही संधी नागपूर येथील राष्ट्रीय महोत्सवामुळे मिळाली. या महोत्सवाची सुरूवात मी सादर केलेल्या माझ्या गणेशवंदनेने झाली. तसेच यानंतर बाजीराव मस्तानीमधील मोहे रंग दो लाल या गाण्यावर नृत्य केले. माझ्या या गाण्याची कोरिओग्राफी माझ्या गुरू सोनिया परचुरे यांनी केली होती. त्यामुळे माझा आनंद व्दिगुणित झाला. सोनिया ही नृत्याच्या छोटया गोष्टींवर बारीक लक्ष देत असते. त्यामुळे तिच्याकडून खूप काही शिकायला मिळते. त्याचबरोबर कार्यक्रम झाल्यावर ती रचना विसरायची नसते. ती पुन्हापुन्हा जतन करायची असते. त्यामुळे आयुष्यातील हे दोन क्षण माझ्यासाठी खूपच अविस्मरणीय होते. तसेच आपल्या कलेला कुठेतरी नवीन कलाटणी मिळाल्यावर त्याचा आनंद अधिकच असतो. क्रांतीने कोंबडी पळाली या गाण्यामुळे प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. त्याचबरोबर तिने मराठी चित्रपटांमध्येदेखील आपल्या अभिनयाची छाप निर्माण केली आहे.