​नेहा का आहे सध्या सातवे आसमान पर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2016 12:28 IST2016-10-25T12:28:11+5:302016-10-25T12:28:11+5:30

नेहा जोशीने गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटसृष्टीत आपले नाव निर्माण केले आहे. तिने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये खूप चांगल्या ...

Why is Neha currently on the seventh heaven? | ​नेहा का आहे सध्या सातवे आसमान पर?

​नेहा का आहे सध्या सातवे आसमान पर?

हा जोशीने गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटसृष्टीत आपले नाव निर्माण केले आहे. तिने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिची जोतिबा आणि सावित्रबाई फुले ही मालिका नुकतीच गाजली होती. नेहा सध्या प्रचंड खूश आहे. कारण तिला तिच्या कारकिर्दीतील पहिली जाहिरात मिळाली आहे. कलाकार प्रसिद्ध झाले की, आपोआप त्यांच्याकडे जाहिराच्या ऑफर्स येऊ लागतात असे म्हटले जाते. त्याचप्रकारे आता नेहाला अनेक जाहिरातींच्या ऑफर्स येऊ लागल्या आहेत आणि तिने आता एका जाहिरातीत कामदेखील केले आहे. 
तिच्या पहिल्या जाहिरातीत ती शेरनाझ पटेलसोबत आपल्याला पाहायला मिळत आहे. शेरनाझ ही खूप चांगली सहकलाकार असून तिच्यासोबत काम करायला खूप मजा आली असे नेहाने म्हटले आहे. ती खूप चांगली सहकलाकार असल्याबद्दल फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवरून तिने शेरनाझचे आभारदेखील मानले आहेत. या जाहिरातीत नेहा एका मोलकरणीच्या भूमिकेत दिसत आहे. तिची मालकीण सकाळपासून तिला काही ना काही तरी काम करायला सांगत आहे. तसेच अतिशय चविष्ट जेवणदेखील बनवत आहे. घरातील चांगली क्रोकरी वापरायला सांगत आहे. घरात पाहुणे येणार आहेत त्याची ही तयारी असल्याचेही तिला ती सांगतेय. पण कोण पाहुणे येणार आहे हे तिला काहीच बोध लागत नाहीये. मालकिणीने तिच्याच घरातल्यांना बोलावले आहे हे कळल्यावर तिला सुखद आश्चर्याचा धक्का बसतो. या जाहिरातीतील तिची आणि शेरनाझची केमिस्ट्री खूपच छान जमून आली आहे.  


Web Title: Why is Neha currently on the seventh heaven?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.