शरद केळकरला का झालाय इतका आनंद?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2016 13:02 IST2016-12-11T15:56:56+5:302016-12-12T13:02:46+5:30

 प्रत्येकाला आपल्या आवडत्या कलाकार, खेळाडूसोबत फोटो काढण्याची इच्छा असते. ही इच्छा पूर्ण झाली की आपण जणू चॅम्पियनच बनलो असे ...

Why is the joy of Sharad Kelkar? | शरद केळकरला का झालाय इतका आनंद?

शरद केळकरला का झालाय इतका आनंद?

 
्रत्येकाला आपल्या आवडत्या कलाकार, खेळाडूसोबत फोटो काढण्याची इच्छा असते. ही इच्छा पूर्ण झाली की आपण जणू चॅम्पियनच बनलो असे आपल्याला वाटते. असेच काहीसे चॅम्पियन बनल्याचे अभिनेता शरद केळकर याला वाटत आहे. कारण नुकतेच शरदने सोशलमीडियावर क्रिकेट प्लेअर क्रिस गेल याच्यासोबत एक झक्कास सेल्फी काढला आहे. क्रिस गेलसोबत फोटो काढण्याची इच्छा तर प्रत्येकाची असणार. आपल्या धुव्वाधार खेळाने या खेळाडूने ेप्रत्येकाच्या मनात जागा निर्माण केली आहे. या खेळाडूचे फक्त वेस्टइंडीज याच देशात चाहते नाही आहेत. तर संपूर्ण जगात या खेळाडूचे चाहते पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर फक्त खेळच नाही तर याच्या गाण्याचेदेखील अफाट चाहते असल्याचे पाहायला मिळाले. वर्ल्डकपच्या वेळेस तर या गाण्याने संपूर्ण क्रिकेटक्षेत्रालाच वेड लावून ठेवले होते. त्याच्या चॅम्पियन या गाण्यावर खेळाडूसहित प्रत्येक प्रेक्षकांचे पाय थिरकताना पाहायला मिळाले. या गाण्याने त्याच्या खेळासारखेच प्रत्येकाचे मनावर आधिराज्य गाजविले आहे. त्याची चॅम्पियन या गाण्याची स्टेप तर प्रचंड गाजली. आज ही हे गाणे कानावर पडले की, लहानांपासून ते मोठयांपर्यत या गाण्यावर थिरकताना दिसत असतात. अशा या खेळाडूसोबत सेल्फी मिळणे म्हणजे स्वप्नांना चार चाँद लागल्यासारखेच आहे. शरदने यापूर्वी मराठी आणि बॉलिवुड चित्रपटसृष्ट्रीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्याने मराठीमध्ये उत्तरायण, चिनु, लय भारी अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहेत. तसेच हिरो, रॉकी हँडसम, गोलियो की रासलीला रामलीला असे अनेक सुपरहीट चित्रपट त्याने बॉलिवुडमध्ये केले आहेत. त्याचबरोबर त्याने मालिकेतूनदेखील आपल्या अभिनयाची जादू दाखविली आहे. असा या मराठमोळा अभिनेता शरद केळकर मराठी असो या बॉलिवुड दोन्हीकडे चॅम्पियन बनला असल्याचे पाहायला मिळत आहे. 

Web Title: Why is the joy of Sharad Kelkar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.