का म्हणतेय सखी "सारी का फॉल सा मॅच किया रे"?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2017 15:57 IST2017-05-12T06:52:45+5:302017-05-12T15:57:17+5:30

ब-याचदा सखी वेस्टर्न आऊटफिटमध्ये नाहीतर पारंपरिक लूकमध्ये पाहायला मिळते. तिला वेस्टर्नपेक्षा पारंपरिक ड्रेसिंग जास्त भावते असे तिच्त्याया फोटोवरून समजते.

Why does Sarai match the truth? | का म्हणतेय सखी "सारी का फॉल सा मॅच किया रे"?

का म्हणतेय सखी "सारी का फॉल सा मॅच किया रे"?

'
;'सारी का फॉल सा  मॅच किया रे''..... असे आम्ही नाही तर चक्क अभिनेत्री सखी गोखले बोलतेय,त्याचे झाले असे की,आपल्या अभिनयानं मनं जिंकणारी सखी गोखले सोशल मीडियावरही बरीच एक्टिव्ह असते.सध्या तिचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर नेटिझन्सला चांगलाच भावतोय. यांत तिचा लूक एकदम वेगळा आणि हटके असल्याने तो रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतो आहे.फोटोत सखीचा साडीतला हटके अंदाज तितकाच खास वाटतो आहे.एरव्ही ग्लॅमर दुनियेत कलाकारांना त्यांच्या अभिनयाइतकेच त्यांच्या ड्रेसिंग स्टाइलही खूप महत्त्वाची असते.ब-याचदा अभिनेत्री स्वतःला प्रेझेंटेबल ठेवण्यासाठी वेस्टर्न लूक असलेले ड्रेसिंग करत असल्याचे पाहायला मिळतं.मात्र सखी या सगळ्या गोष्टींना अपवाद ठरल्याचे पाहायला मिळत आहे.ब-याचदा सखी वेस्टर्न आऊटफिटमध्ये नाहीतर पारंपरिक लूकमध्ये पाहायला मिळते. तिला वेस्टर्नपेक्षा पारंपरिक ड्रेसिंग जास्त भावते असे तिच्या फोटोवरून समजते.ब-याचवेळी सखी  सोशल मीडियावर तिचे साडीमध्ये असलेले नवनवीन फोटो अपलोड करत असते. तिच्या या फोटोंनाही तिच्या चाहत्यांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.प्रत्येकाचा फॅशन फंडा वेगवेगळा असतो. प्रत्येकाची आपली वेगळी स्टाइल असते.अगदी त्याचप्रमाणे सखी गोखलेची एक वेगळी स्टाइल आहे.त्यामुळे सखीच्या या फॅशनेबल साडी लूकची रसिकांनाही चांगलीच भुरळ पडत असल्याचे पाहायला मिळतंय.छोट्या पडद्यावर 'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेत सखी गोखलेचे 'रेश्मा' ही भूमिका रसिकांच्या पसंती उतरली होती.त्यानंतर रसिकांच्या पुन्हा एकदा दिल दोस्ती दोबारा या मालिकेत सखी परी ही भूमिका साकारत आहे. याशिवाय सखी गोखले अमेय वाघ, सुव्रत जोशी, पूजा ठोंबरे या कलाकारांचा समावेश असलेल्या 'अमर फोटो स्टुडिओ' या नाटकालाही रसिकांकडून खूप कौतुक होत आहे.

 
 
 
 

Web Title: Why does Sarai match the truth?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.