कोणासोबत करायचे मानसी नाईकला लग्न?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2016 15:04 IST2016-12-20T15:04:39+5:302016-12-20T15:04:39+5:30
प्रत्येक मुलीच्या स्वप्नातला एक राजा असतो. तिला त्या स्वप्नातील राजासोबत लग्न करण्याची इच्छा असते. त्याचबरोबर स्वप्नातील राजाप्रमाणे तरी आपल्याला ...

कोणासोबत करायचे मानसी नाईकला लग्न?
प रत्येक मुलीच्या स्वप्नातला एक राजा असतो. तिला त्या स्वप्नातील राजासोबत लग्न करण्याची इच्छा असते. त्याचबरोबर स्वप्नातील राजाप्रमाणे तरी आपल्याला जीवनसाथी मिळावा असे त्या मुलीला वाटत असते. असेच एक स्वप्न अभिनेत्री मानसी नाईकने एका कार्यक्रमात आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहे. मानसीला एका कार्यक्रमात विचारण्यात आले की, तुला भविष्यात कोणासोबत लग्न करण्यास आवडेल. त्यावेळी प्रेक्षकांची ही लाडकी अभिनेत्री आपल्या बिनधास्त अंदाजात म्हणाली, जर रणवीर सिंह माझ्यासोबत लग्न करण्यासाठी तयार असेल तर मी ही लग्न करण्यासाठी तयार आहे. तिच्या या उत्तरावरून कळते की, मानसी ही बॉलिवूडचा तगडा अभिनेता रणवीर सिंहची किती मोठी चाहती आहे. या अभिनेत्रीने नेहमीच आपल्या नृत्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. तसेच बघतोय रिक्षावाला, बाई वाड्यावर या तिच्या गाण्यांवर प्रेक्षकदेखील कल्ला करताना पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर तिने एकता-एक पॉवर, कॅपेचिनो, कुटुंब, तीन बायका फजिती ऐका, तुक्या तुकविला नाग्या नाचविला, जबरदस्त, मर्डर मेस्त्री, दि शॅडो, ढोलकी, कॅरी आॅन देशपांडे आदी चित्रपटांतून आपल्या अभिनयाचीदेखील चुणूक दाखविली आहे. मानसी नेहमीच आपल्या अभिनयाने आणि नृत्याने प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. सध्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये लग्नाचे वारे वाहत आहेत. असं असताना आपल्या आवडत्या कलाकारांच्या लग्नाविषयी जाणून घेण्यासाठी अनेकांना आवडत असेल. म्हणूनच मानसी नाईकला तिच्या लग्नाविषयी हा प्रश्न विचारण्यात आला होता. तसेच मानसीचे हे उत्तर ऐकून नक्कीच तिच्या काही चाहत्यांचे मन तुटले असणार हे खरं.
![]()