नानांना कोणाची आठवण येते ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2016 12:25 IST2016-12-12T12:25:46+5:302016-12-12T12:25:46+5:30

अभिनेते नाना पाटेकर नेहमीच त्यांच्या तडफदार अभिनयामुळे ओळखले जातात. एका पाठोपाठ एक असे कितीतरी दर्जेदार चित्रपट केलेले नाना प्रेक्षकांच्या ...

Whom can you remember? | नानांना कोणाची आठवण येते ?

नानांना कोणाची आठवण येते ?

िनेते नाना पाटेकर नेहमीच त्यांच्या तडफदार अभिनयामुळे ओळखले जातात. एका पाठोपाठ एक असे कितीतरी दर्जेदार चित्रपट केलेले नाना प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करुन आहेत. चित्रपट आणि सामाजिक अशा दोनही क्षेत्रात सध्या आघाडीवर असलेले नाना कोणाच्यातरी आठवणीत पार बुडालेले आहेत. आता तुम्ही म्हणाल की नानांना कोणाची आठवण आली बरं. तर नाना बुडाले आहेत अग्नीसाक्षी गर्ल मनिषा कोईरालाच्या आठवणीत. होय, पूर्वी नाना आणि मनिषा यांचे प्रेमसंबंध असल्याचे बोलले जात होते. अनेक कार्यक्रमांमध्ये हे दोघे एकत्रही दिसले होते. परंतू काही कारणास्तव या दोघांमध्ये दुरावा आला आणि यांनी आपले नाते संपवले होते. नाना पाटेकर त्यावेळी नीलकांती यांच्यासोबत विवाहबदध होते. तर त्यांना नीलकांतीला घटस्पोट दयायचा नसल्या कारणाने मनिषाने हे नाते थांबवले असल्याचे देखील बोलले जाते. फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत नाना म्हणाले होते की, त्यांना मनिषाची फार आठवण येते. ती सर्वात संवेदनशील अभिनेत्री आहे. ती कस्तुरी हरणासारखी आहे. तिला हे कळले पाहिजे की तिला दुसºयांबरोबर स्पर्धा करायची काहीच गरज नाही. तिच्याकडे सर्व काही आहे. तिने स्वत:ची जी अवस्था करुन घेतली आहे ते पाहून मला खूप रडू येतं. कदाचित माझ्याकडे आज तिच्याबद्दल बोलण्यासारखे काहीच नाही. प्रेमभंग ही खूप कष्टदायक गोष्ट आहे. वेदना म्हणजे नक्की काय हे अनुभवण्यासाठी हा अनुभव घेणेही गरजेचे असते. मला तेव्हा झालेल्या वेदनी मी सांगू शकत नाही. कृपया याबद्दल आपण नको बोलूया. मला आजही मनिषाची आठवण येते. मनिषाच्या आठवणींमध्ये हळवे झालेले नाना पाहता नक्कीच यांचे नाते सखोल होते हेच यावरुन तरी दिसून येते. 

Web Title: Whom can you remember?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.