प्रसाद कोणाला म्हणतोय...बादचलन?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2016 11:48 IST2016-12-08T11:48:27+5:302016-12-08T11:48:27+5:30
प्रसाद ओक सध्या त्याच्या काही चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. परंतू असे असताना देखील तो सोशल साईट्सवर सतत अपडेटेड असतो. ...

प्रसाद कोणाला म्हणतोय...बादचलन?
प रसाद ओक सध्या त्याच्या काही चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. परंतू असे असताना देखील तो सोशल साईट्सवर सतत अपडेटेड असतो. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी आता कलाकारांना सोशल मीडिया हा चांगलाच पर्याय उपलब्ध झाला आहे. कोणतीही गोष्ट अगदी सेकंदात आपल्या चाहत्यांपर्यंत एका पोस्टमुळे त्यांना पोहचवता येतात. मग ती गोष्ट कितीही महत्वाची असो किंवा एखादी हलकी-फुलकी बातमी असो, क्षणार्धात त्या सर्वांपर्यंत जातात. प्रसाद तर नेहमीच सोशल साईट्सवर अॅक्टीव्ह असल्याचे दिसते. सिनेमाच्या चित्रीकरणावेळचे फोटो किंवा छोट्या-मोठ्या घडामोडी तो सतत अपडेट करत असतो. पण तुम्हाला हे माहितीय का जसे कवी किंवा लेखक असतात तसाच आता प्रसाद देखील एका क्षेत्रातील मास्टर झालाय असे म्हणायला काहीच हरकत नाही. त्याचे कारण देखील तसेच आहे. प्रसाद वेगवेगळे जोक्स निर्माण करुन ते प पू प्रसाद या नावाने सोशल साईटसवर अपलोड करीत असतो. बरं त्याच्या या जोक्सला चाहत्यांकडून लाईक देखील केले जाते. आता हेच पाहा ना, नुकतेच त्याने नोटाबंदीवर चार ओळी लिहील्या आहेत. तो लिहीतोय,
जुनं चलन बाद झालंय
नवीन हातात येतंच नाहीये
अशा स्थितीतल्या माणसाला
बाद चलन माणूस
असंच म्हणावं लागेल...नाही का???
प पू प्रसाद....
आता बोला, प्रसादच्या या सेन्स आॅफ ह्युमर समोर सगळ््यांचीच बोलती बंद झाली एवढे मात्र नक्की.
जुनं चलन बाद झालंय
नवीन हातात येतंच नाहीये
अशा स्थितीतल्या माणसाला
बाद चलन माणूस
असंच म्हणावं लागेल...नाही का???
प पू प्रसाद....
आता बोला, प्रसादच्या या सेन्स आॅफ ह्युमर समोर सगळ््यांचीच बोलती बंद झाली एवढे मात्र नक्की.