​ वीणाचं सिक्रेट क्रश कोण आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 11:54 IST2016-12-06T11:52:56+5:302016-12-06T11:54:54+5:30

 अभिनेत्री वीणा जामकरने तिच्या दमदार अभिनयामुळे आहे चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रत्येक चित्रपटातून दमदार भूमिकेत दिसणाºया ...

Who is the Secret Crush of the Veena? | ​ वीणाचं सिक्रेट क्रश कोण आहे?

​ वीणाचं सिक्रेट क्रश कोण आहे?

 
भिनेत्री वीणा जामकरने तिच्या दमदार अभिनयामुळे आहे चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रत्येक चित्रपटातून दमदार भूमिकेत दिसणाºया वीणाचे सिक्रेट क्रश कोण आहे हे तुम्हाला माहितीय का? वीणाला क्रिकेटर राहूल द्रविड फार आवडतो म्हणे. तिच्या या क्रशबददल वीणा सांगते, माझं आॅल टाइम क्रश म्हणजे राहुल द्रविड. क्रशमध्ये त्या व्यक्तीला सांगण्यापेक्षा योग्य व्यक्तीवर ते होण गरजेचं असतं. कॉलेजमध्ये असताना तुम्ही कोणावरतरी भारावून जाता. एकदम आणि कळत नकळत त्या व्यक्तीला फॉलो करता. समजा त्या वयात मी राहुल द्रविडची फॅन आहे आणि माझी मैत्रिण एखाद्या आघाडीच्या अभिनेत्याची फॅन आहे. दोघही जण हॉट अ‍ॅण्ड हॅण्डसम आहेत. तरुण, स्मार्ट आणि बॅचलर आहेत. आपापल्या क्षेत्रात काम छान करतात. त्या वयात स्वप्नच ही असतात की जो आवडतो त्याच्याशीच लग्न करायचं. ते एक क्रश असतं ज्याच्याशी आपल्याला लग्न करावसं वाटतं. त्या वयात आपल्याला कळत नसत. तेव्हा त्या कलाकाराच्या किंवा क्रिकेटरच्या आपण प्रेमात पडतो. पण जेव्हा आपण मागे वळून बघतो. तेव्हा मात्र, सामाजिक दृष्ट्या ती व्यक्ती किती चांगली आहे. त्याची बोलण्याची पद्धत, कामाची पद्धत, त्याचं आचरण याचा विचार करतो. मग आपल्याला कळतं की आपण कोणाच्या प्रेमात पडलो होतो. आपण जसंजसं मोठं होतो तेव्हा आपल्याला कळत जातं की हे पौगंडावस्थेतल क्रश असतं किंवा त्या वयातलं आकर्षण असतं. मग तेव्हा आपण विचार करतो की आपण कोणाच्या प्रेमात पडलो होतो? आता द्रविडचं लग्न झालं आणि माझही करियर झालं आहे. पण आजही मी जेव्हा जेव्हा राहुलला बोलताना बघते किंवा त्याच्या मुलाखती वाचते तेव्हा मला अभिमान वाटतो. चित्रपटसृष्टी आणि क्रिकेट यांचे जवळचे नाते असल्याचे अनेकदा बोलले जाते. बºयाच अभिनेत्रींनी क्रिेकेटरची विकेट घेऊन त्यांना क्लिन बोल्ड देखील केले आहे. आता या यादीत वीणाचा देखील समावेश झाला आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही.

Web Title: Who is the Secret Crush of the Veena?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.