समीर विव्दांससाठी कोण आहेत दैवत ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2016 13:34 IST2016-12-19T12:00:06+5:302016-12-19T13:34:23+5:30

जगात दोन प्रकारची लोक आहेत. एक अशी की, सोशलमीडियावर भरभरून फोटोज शेअर करत असतात. तर दुसरीकडे काही लोक इच्छा ...

Who are Gods for Sameer? | समीर विव्दांससाठी कोण आहेत दैवत ?

समीर विव्दांससाठी कोण आहेत दैवत ?

ात दोन प्रकारची लोक आहेत. एक अशी की, सोशलमीडियावर भरभरून फोटोज शेअर करत असतात. तर दुसरीकडे काही लोक इच्छा असूनदेखील फोटो सोशलमीडियावर अपलोड करत नाही. यामागचे नक्की कारण काय आहे हे अदयापदेखील उलगडले नाही. मात्र मराठी चित्रपटसृष्ट्रीचा प्रेक्षकांचा लाडका दिग्दर्शक समीर विव्दांस यानेदेखील नुकतचा एक फोटो अपलोड केला आहे. त्याचबरोबर खूप दिवस झाले हा फोटो अपलोड करण्याची इच्छा होती. मात्र आज हा  फोटोचा मोह आवरला नाही म्हणून अपलोड केला असल्याचे त्याने सोशलमीडियावर सांगितले आहे. त्याचा हा फोटो आहे बॉलीवूडचा तगडा संगीतकार ए. आर. रहमानसोबतचा आहे. कारण नुकतेच संगीतकार ए.आर. रहमान पुन्हा एकदा आॅस्करच्या शर्यतीत आहे.  पेले : द बर्थ आॅफ अ लिजंड या चित्रपटाला दिलेल्या संगीतासाठी रहमानला आॅस्कर पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे. त्यामुळे समीर यांनी ए आर रहमान यांना शुभेच्छा देत हा फोटो सोशलमीडियावर शेअर केला आहे. त्यांच्या या फोटोला सोशलमिडीयावर भरभरून लाइक्स मिळताना दिसत आहे. तसेच त्यांनी एक पोस्टदेखील शेअर केली आहे. ते आपल्या पोस्टच्या माध्यमातून सांगतात की, आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर जर ३ दैवतं माज्या आयुष्यात आली नसती तर मी कसा जगलो असतो मला खरंच माहित नाही.. 
१. सचिन तेंडुलकर 
२. ए.आर. रेहमान 
३.विजय तेंडुलकर
यातल्या ह्या देवाने माज्या मनाचा प्रत्येक कोपरा हळवा ठेवला.. त्याला काही दिवसांपुर्वी भेटायचा योग आला.. त्याने चक्कं गप्पा मारल्या, अगदी त्याने पाहिलेल्या आणि आवडलेल्या मराठी चित्रपटांपासून ते सामाजीक राजकीय मुद्दयांपर्यंत. बोलताना मधेच थांबला, काळजीने म्हणाला, 'ह्या जगाला काय झालंय?! हे असं अधिक जहाल का बनत चालंलंय?!' आणि मग स्वत:च 'माहित नाही' असा चेहरा केला.. हा फोटो पोस्ट करायचा मोह खूप दिवस टाळला पण आता राहवेना... कारण.. 'मिट्टी जैसे सपने कितना भी पलकों से झाड़ो फिर आजाते है.' समीर यांनी  'वायझेड' या चित्रपटाची कथा लिहीली आहे. तसेच 
'डबल सीट', 'टाईम प्लीज' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्याचबरोबर 'क्लासमेट्स', 'लग्न पाहावे करुन' यांसारख्या चित्रपटांसाठी पटकथा लिहिली आहे. त्यांच्या नवा गडी नवं राज्य या सुपरहीट नाटकाचे शंभरहून अधिक प्रयोग झाले. लोकमान्य- एक युगपुरूष या चित्रपटात दिग्दर्शक समीर विध्वंस यांच्या अभिनयाची चुणूक पाहायला मिळाली. 

Web Title: Who are Gods for Sameer?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.