कोणत्या चित्रपटाचे तृप्ती करतेय दिग्दर्शन ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2016 16:22 IST2016-11-09T17:09:30+5:302016-11-11T16:22:24+5:30
अभिनेत्री तृप्ती भोईरने नेहमीच वेगवेगळ्या भूमिका चित्रपटात साकारुन स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तृप्ती अभिनेत्री तर आहेच ...

कोणत्या चित्रपटाचे तृप्ती करतेय दिग्दर्शन ?
< div style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">अभिनेत्री तृप्ती भोईरने नेहमीच वेगवेगळ्या भूमिका चित्रपटात साकारुन स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तृप्ती अभिनेत्री तर आहेच परंतु ती निर्माती देखील आहे. अगडबम या मराठी चित्रपटाची निर्मिती तृप्तीने केली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांनी देखील पसंती दशर्विली होती. वजन वाढवलेल्या लूकमध्ये येऊन तृप्तीने सर्वांनाच धक्का दिला होता. या चित्रपटासाठी तिने प्रोस्थेटिक मेकअपचा वापर केला होता. अगडबममध्ये तृप्तीने अतिशय मेहनत घेऊन नाजुका हे पात्र साकारले होते. आता पुन्हा एकदा तृप्ती हे आव्हान पेलायला सज्ज झाली आहे. लवकरच 'अगडबम २' या चित्रपटात आपल्याला तृप्ती वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. अहो एवढेच नाही तर तृप्ती अगडबम २ या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील करणार असल्याचे समजतेय. पहिला चित्रपट यशस्वी झाल्यानंतर पुढे काहीतरी करायच असे तिच्या डोक्यात होते. मनातली गोष्ट कॅमेऱ्यात योग्य रितीने उतरविण्यासाठी तिने स्वत:च दिग्दर्शन करण्याचे ठरविले आहे. पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाल्यानंतर आता अगडबमच्या सिक्वेलच्या तयारीला ती लागली आहे. मकरंद अनासपुरे यांनी तिच्या नवऱ्याची भूमिका या चित्रपटात साकारली होती. 'अगडबम २'मध्ये देखील तृप्ती सोबत मकरंदच असणार की नाही हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण नाजुकाचे पात्र तुप्तीच साकारणार असल्याचे कळतेय. अगडबमपेक्षा या चित्रपटातील तुप्तीची भूमिका हटके असल्याचे बोलले जात आहे. पहिल्या चित्रपटात तर ती आपल्याला लठ्ठ दिसली होती. मग आता दुसऱ्या भागात पण ती जाडच असणार कि बारीक होऊन प्रेक्षकांसमोर येणार हे तर आपल्याला लवकरच समजेल.