काय आहे सुयशच्या पेन्टिंगचा राज ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2016 18:33 IST2016-11-09T18:33:15+5:302016-11-09T18:33:15+5:30
प्रत्येक व्यक्ती हा आपल्याजवळ काहीतरी भन्नाट गोष्ट असल्यास ती सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याचप्रमाणे ती गोष्ट काय आहे ...

काय आहे सुयशच्या पेन्टिंगचा राज ?
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;"> प्रत्येक व्यक्ती हा आपल्याजवळ काहीतरी भन्नाट गोष्ट असल्यास ती सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याचप्रमाणे ती गोष्ट काय आहे ही ओळखण्याची जबाबदारीदेखील आपल्या मित्र-मंडळावर सोडत असतात. असाच काहीसा प्रयत्न अभिनेता सुयश टिळकचे चाहतेदेखील करताना दिसत आहेत. नुकतेच सुयशने सोशल मीडियावर एक पेन्टिंग अपलोड केले आहे. ती पेन्टिंग नक्की काय आहे हे ओळखण्याची जबाबदारी मात्र त्याने त्याच्या चाहत्यांवर सोडली आहे. त्याच्या या पेन्टिंगला भरभरून कमेंन्टदेखील मिळताना दिसत आहेत. सुयशचे चाहतेदेखील एक से एक गंमतीशीर कमेंन्ट करताना दिसत आहेत. पण अदयाप त्याचे उत्तर मिळाले नसल्याचे दिसत आहेत. त्याच्या या पेन्टिंगविषयी लोकमत सीएनएक्सला सुयश सांगतो, मला नेहमीच काहीतरी नवीन आणि वेगवेगळया गोष्टी करायला फार आवडतात. त्यातलीच ही पेन्टिंग एक आहे. सोशल मीडियावर एक पेन्टिंग अपलोड केले आहे. ही पेन्टिंग नक्की काय आहे हे ओळखण्यासाठी प्रेक्षक देखील भरपूर प्रयत्न करताना दिसत आहेत. पण खरं सांगू का माझा एक नवीन प्रोजेक्ट आहे. त्यासंबंधीच ही गोष्ट आहे. पण तो प्रोजेक्ट मालिका आहे का चित्रपट आहे हे अदयाप तरी कळाले नाही. मात्र या पेन्टिंगचा राज लवकरच प्रेक्षकांना कळेल. सुयशने यापूर्वी का रे दुरावा या मालिकेतून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. तसेच चित्रपट आणि नाटकमधूनदेखील त्याने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे.
![]()