नाना पाटेकर यांना कोणता निर्णय पटला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2016 14:29 IST2016-11-16T14:29:25+5:302016-11-16T14:29:25+5:30

गेली कित्येक वर्ष अभिनेता नाना पाटेकर हे मराठी चित्रपटसृष्टीवर आधिराज्य गाजवत आहे. त्याचबरोबर बॉलिवूडमध्येदेखील त्यांनी आपली जागा निर्माण केली ...

What decision did Nana Patekar make? | नाना पाटेकर यांना कोणता निर्णय पटला?

नाना पाटेकर यांना कोणता निर्णय पटला?

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">गेली कित्येक वर्ष अभिनेता नाना पाटेकर हे मराठी चित्रपटसृष्टीवर आधिराज्य गाजवत आहे. त्याचबरोबर बॉलिवूडमध्येदेखील त्यांनी आपली जागा निर्माण केली आहे. तसेच नाना हे नाम या समाजिक संस्थेच्या माध्यमातून करत असलेले समाजकार्यची दखल प्रेक्षकांनीदेखील घेतली आहे. अशा या दिग्गज मराठी कलाकाराला केंद्र सरकारकडून घेण्यात आलेला नोटबंदीचा निर्णय योग्य असल्याचे वाटत असल्याचे म्हटले आहे.  काळ्या पैशाला चाप लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा घेतलेला निर्णय योग्य असल्याचे नाना पाटेकर म्हणालेत. मोदींच्या या निर्णयाचे  मराठी आणि बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी स्वागत केले आहेत. तसेच मोठया प्रमाणात सामान्य जनतादेखील मोदीच्या या निर्णयावर सहमत आहे. नानांनी पुन्हा नटसम्राट या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप निर्माण केली आहे. त्यांच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडोचा गल्ला कमविला आहे. नुकतेच नानांनी जम्मू-काश्मीरच्या कथुआ येथील सीमा सुरक्षा दलाच्या छावणीला जाऊन भेट दिली.  

Web Title: What decision did Nana Patekar make?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.