वज्र चित्रपटाविषयी काय म्हणतात कलाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2017 12:15 IST2017-01-13T12:08:23+5:302017-01-13T12:15:26+5:30

 मयूर करंबळीकर दिग्दर्शित वज्र हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची संपूर्ण टीमच नवीन आहे. त्यामुळे एका नवोदित ...

What is the artist called about Vajra movie? | वज्र चित्रपटाविषयी काय म्हणतात कलाकार

वज्र चित्रपटाविषयी काय म्हणतात कलाकार

 
यूर करंबळीकर दिग्दर्शित वज्र हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची संपूर्ण टीमच नवीन आहे. त्यामुळे एका नवोदित कलाकारांचा अभिनय आणि कला प्रेक्षकांना या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री मानसी नाईक हिने खास आपल्या अंदाजात मुजरा सादर केला आहे. त्यामुळे तिचा हा मराठमोळा मुजºयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. तसेच या चित्रपटात राहुल सोलापूरकर, उल्हास आढाव, मीरा पाथरकर, अभिनीत पंगे, समर्थ बारी या कलाकारांचा समावेश आहे. या चित्रपटाविषयी राहूल सोलापूरकर सांगतात, फिल्म वज्र मध्ये सर्वच तरुण मंडळी आहे. तरुणांचा एक वेगळा प्रत्यन दिसणार आहे. मला असं वाटत प्रेक्षकांनी योग्य तो प्रतिसाद चित्रपटाला द्यावा.वज्र च्या संपूर्ण टीम ला पुढच्या सगळ्याच प्रोजेक्ट्स साठी माज्या मनापासून शुभेच्छा. 

       दिग्दर्शक मयूर करंबळीकर सांगतात, माझा आणि माज्या टीमचा आव्हानात्मक असा प्रयत्न राहिला. बºयाच आर्थिक आणि तांत्रिक अडचणींचा सामना करून आम्ही हा चित्रपट वेगळ्या स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.मी माज्या संपूर्ण टीमचा ऋणी आहे.वज्र हा चित्रपट व्यावसायिक असल्याकारणानें प्रेक्षकांनी चित्रपट मनोरंजनात्मक स्वरूपातच बघायचा आहे. मी लवकरच माज्या प्रेक्षकांसाठी एक नवीन धम्माल कॉमेडी आणि नव्या कथेवरचा चित्रपट घेऊन येत आहे. 
     
               मयूर करंबळीकर,दिनेश पवार, शार्विल जोशी आणि संपूर्ण टीम सोबत काम करतांना मला  सुद्धा माज्या  कॉलेजच्या दिवसांची आठवण झाली. दिग्दर्शकाने खूप चांगल्या प्रकारे, सोप्प्या भाषेत,सर्वच सीन समजावून सांगितल्याने कधीच कुठल्या गोष्टीची अडचण आली नाही . ज्युनिअर टीम कडून खूप काही शिकायला मिळाले . प्रत्येकाला मनापासून वज्र हा  माझा सिनेमा आहे हे सांगावस वाटत असल्याचे अभिनेता उल्हास पवार यांनी सांगितले. 

Web Title: What is the artist called about Vajra movie?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.