​ प्राजक्ता काय करतेय हंपीत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 13:22 IST2016-12-06T13:22:36+5:302016-12-06T13:22:36+5:30

अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या हंपीत असल्याचे समजत आहे. प्राजक्ताने हंपीमधील तिचा एक झक्कास फोटो नुकताच सोशल साईट्सवर शेअर केला आहे. बरं तुम्हाला वाटेल की प्राजक्ता हंपीमध्ये फिरायला गेली असेल. तर तसे बिलकुलच काही नाहीये. प्राजक्ता हंपीला गेलीय खरी पण ती मजा-मस्ती करायला नाही तर फक्त कामासाठी गेलीय.

What are you doing? | ​ प्राजक्ता काय करतेय हंपीत?

​ प्राजक्ता काय करतेय हंपीत?

िनेत्री प्राजक्ता माळी सध्या हंपीत असल्याचे समजत आहे. प्राजक्ताने हंपीमधील तिचा एक झक्कास फोटो नुकताच सोशल साईट्सवर शेअर केला आहे. बरं तुम्हाला वाटेल की प्राजक्ता हंपीमध्ये फिरायला गेली असेल. तर तसे बिलकुलच काही नाहीये. प्राजक्ता हंपीला गेलीय खरी पण ती मजा-मस्ती करायला नाही तर फक्त कामासाठी गेलीय. आगामी एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ती सध्या हंपीमध्ये राहतेय. प्रकाश कुंटे दिग्दर्शीत या चित्रपटामध्ये सोनाली कुलकर्णी, ललित प्रभाकर आणि प्रियदर्शन जाधव यांच्या देखील भूमिका आहेत. ही सर्व टिम सध्या हंपीमध्ये चित्रीकरण करीत असल्याचे समजतेय. कर्नाटकातील हंपी हे अतिशय सुंदर ऐतिहासीक ठिकाण आहे. पहिल्यांदाच मराठी चित्रपटामध्ये हंपीचे सौंदर्य प्रेक्षकांना पाहता येणार आहे. एका वेगळ विषयावरील हा सिनेमा असल्याचे प्रकाश कुंटे यांनी सांगितलेच हाते. प्राजक्ताची एक महत्वपूर्ण भूमिका या चित्रपटात असल्याचे कळतेय. सोनाली कुलकर्णी आणि प्राजक्ता या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. प्राजक्ताचे शूटिंग १७ डिसेंबर पर्यंत चालणार असल्याचे कळतेय. हा संपूर्ण चित्रपट हंपीमध्येच शूट करण्यात येणार आहे. चित्रपटाचे चित्रीकरण तर झापाट्यात सुरु असून लवकरच चित्रपट पूर्ण होईल असे दिसतेय. प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती एकदमच कुल लुकमध्ये दिसत आहे. आता चित्रपटात देखील ती याच लुकमध्ये दिसणार का? हे मात्र अजुन तरी समजलेले नाही. परंतू या चित्रपटासाठी प्राजक्ता फारच उत्सुक असल्याचे तिने लोकमत सीएनएक्सशी बोलताना सांगितले आहे. 

Web Title: What are you doing?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.