वजनदार कलाकारांची दिवाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2016 14:39 IST2016-10-30T14:29:00+5:302016-10-30T14:39:03+5:30

सर्वत्र दिवाळी हा सण उत्साहाने साजरा करत आहे. कोणी सोशल मीडियावर तर कोणी प्रत्यक्षात भेटून एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत ...

Weightlifting Artists Diwali | वजनदार कलाकारांची दिवाळी

वजनदार कलाकारांची दिवाळी

्वत्र दिवाळी हा सण उत्साहाने साजरा करत आहे. कोणी सोशल मीडियावर तर कोणी प्रत्यक्षात भेटून एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. तसेच भल्या पहाटे उठून दारासमोर रांगोळया, पणत्या लावून संपूर्ण वातावरण तेजोमय झालेले दिसून येत आहे. असा हा आनंदाचा सण कलाकारदेखील मोठया उत्साहात साजरा करताना दिसत आहेत. काही कलाकारांनी तर स्वत:च्या हातांनी आकाशकंदील व पणत्या तयार केल्याचे दिसत आहेत. तर काही अभिनेत्री दिवाळीचा फराळ स्वत: बनवत असताना पाहायला मिळाले आहे. पण आशा या दिवाळीमय वातावरणात काही कलाकारांचा आगामी चित्रपट येवू पाहात आहे. त्यामुळे या कलाकारांसाठी ही दिवाळी म्हणजे डबल धमाका असणार आहे. आता हेच पाहा ना, सचिन कुंडलकर दिग्दर्शित वजनदार हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री प्रिया बापट, सई ताम्हणकर, सिध्दार्थ चांदेकर, चिराग पाटील या कलाकारांचा समावेश आहे. या चित्रपटासाठी प्रियाने चक्क १६ किलो वजन वाढविले आहे. तसेच प्रिया व सईच्या या वजनदार भूमिकेची चर्चादेखील रंगू लागली आहे. प्रियाने या चित्रपटाच्या माध्यमातून गोलू पोलू हे गाणे गायले आहे. त्यामुळे प्रिया ही अभिनेत्री व गायिका अशा दोन भूमिका या चित्रपटातून पार पाडणार आहे. अशा या वजनदार चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री सई ताम्हणकर, प्रिया बापट  व सिध्दार्थ चांदेकर या कलाकारांनी एकत्रित येवून मोठया उत्साहात दिवाळी साजरी केली आहे. त्यांच्या या फोटोतून त्यांनी रांगोळी, पणत्या, फुलांची सुंदर अशी आरास केली आहे. म्हणूनच दिवाळीच्या उत्साहाबाबत लोकमत सीएनएक्सला प्रि़या सांगते, आमचा वजनदार हा चित्रपट ११ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सर्वजण फराळ खाऊन एकदमच वजनदार झालेले पाहायला मिळणार आहे. या सर्वच वजनदार प्रेक्षकांसाठी आमचा हा चित्रपट पर्वणीच असणार आहे. तसेच या कलाकारांनी यंदाची दिवाळी ही वजनदार असल्याचेदेखील त्यांनी रांगोळीतून सांगितले आहे.





Web Title: Weightlifting Artists Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.