वेडिंग का सिझन है
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2016 01:08 IST2016-03-01T08:08:33+5:302016-03-01T01:08:33+5:30
मराठी इंडस्ट्रीमध्ये सध्या वेडिंग का सिझन है. एकीकडे अर्धी मराठी इंडस्ट्री आॅस्ट्रेलियात आनंद लुटत आहेत. तर दुसरीकडे इंडस्ट्रीमधील तरूणाई ...

वेडिंग का सिझन है
म ाठी इंडस्ट्रीमध्ये सध्या वेडिंग का सिझन है. एकीकडे अर्धी मराठी इंडस्ट्री आॅस्ट्रेलियात आनंद लुटत आहेत. तर दुसरीकडे इंडस्ट्रीमधील तरूणाई लग्न उरकत आहे. सिध्दार्थ मेनन, मृणाल दुसानीस, रिचा परियाली यांच्या पाठोपाठ आता, आलोक राजवाडे ही विवाहबंधानात अडकला आहे. त्याची ड्रिमगर्ल दुसरी, तिसरी कोणी नसून मराठी इंडस्ट्रीतील सुंदर अभिनेत्री पर्ण पेठे आहे. आलोकने राजवाडे अॅर्न्ड सन्स,विहीर या चित्रपटात झळकला होता. तर रमा माधवन या चित्रपटात पर्ण व आलोक दोघे ही पाहायला मिळाले. त्यांची रिल लाइफ जोडी ही रिअल लाइफमध्ये देखील सुंदर दिसते. चला, तर आलोक व पर्ण या दोघांना ही लग्नाच्या शुभेच्छा देउयात.