लंडनच्या रस्त्यावर थिरकताना दिसली प्रार्थना बेहरे, पहा तिचा हा व्हिडीओ
By तेजल गावडे | Updated: October 21, 2020 17:35 IST2020-10-21T17:34:26+5:302020-10-21T17:35:11+5:30
प्रार्थना बेहरेने लंडनच्या रस्त्यावर डान्स करताना व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

लंडनच्या रस्त्यावर थिरकताना दिसली प्रार्थना बेहरे, पहा तिचा हा व्हिडीओ
कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा, मस्का अशा विविध मराठी सिनेमातून आपल्या अभिनयाने रसिकांना वेड लावणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. स्वत:चे हटके फोटो शेअर करून ती तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. सध्या ती लंडनमध्ये छूमंतर या चित्रपटाचे शूटिंग करते आहे. या दरम्यान तिने लंडनच्या रस्त्यावर डान्स करताना व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे.
प्रार्थना बेहरे सध्या लंडनमध्ये असून तिथे ती छूमंतर या मराठी चित्रपटाचे शूटिंग करते आहे. यादरम्यान ती तिथले फोटो व अपडेट चाहत्यांना सोशल मीडियावर देते आहे. नुकताच तिने पहला नशा गाण्यावर थिरकतानाचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
छूमंतर चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत.
ईटाइम्सला प्रार्थना बेहरेने सांगितले की, जवळपास सहा महिन्यांहून जास्त लॉकडाउननंतर कामाला सुरूवात केल्यामुळे मी खूप आनंदी आहे. मला वाटतं की छूमंतर हा पहिला मराठी चित्रपट आहे ज्याचे परदेशात शूटिंग सुरू झाले आहे. त्यामुळे आम्ही खूप उत्सुक आहोत.
प्रार्थना पुढे म्हणाली की, सुव्रत जोशी आणि रिंकू राजगुरू लवकरच शूटिंगला सुरूवात करतील. यापूर्वी मी रिंकूसोबत काम केलेले नाही. आमचा पहिला मराठी चित्रपट आहे, ज्यात आम्ही काम करतोय.
प्रार्थना बेहरे, रिंकू राजगुरू, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना यांना एकत्र रुपेरी पडद्यावर काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे.