पाहा हा चित्रपट विदाऊट ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2016 05:50 PM2016-12-23T17:50:19+5:302016-12-23T17:50:19+5:30

या वर्षातल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘राजवाडे अँड सन्स’ या चित्रपटाचा प्रेक्षकांना घरबसल्या  थिएटरमध्ये पहिल्यासारखा अनुभव मिळणार आहे. स्टार ...

Watch this movie breaks the break | पाहा हा चित्रपट विदाऊट ब्रेक

पाहा हा चित्रपट विदाऊट ब्रेक

googlenewsNext
वर्षातल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘राजवाडे अँड सन्स’ या चित्रपटाचा प्रेक्षकांना घरबसल्या  थिएटरमध्ये पहिल्यासारखा अनुभव मिळणार आहे.

स्टार प्रवाहवर प्रत्येक रविवार 'सिनेमावार' म्हणून साजरा केला जात आहे. त्यात नव्या चित्रपटांचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर केला जात आहे.  त्यानुसार येत्या २५ डिसेंबर रोजी दुपारी १ आणि रात्री ८:३० वाजता ‘राजवाडे अँड सन्स’ प्रेक्षकांना सलग ब्रेकलेस पाहता येईल.

एकत्र कुटुंबातील तीन पिढ्यांचं चित्रण असलेल्या  ‘राजवाडे अँड सन्स’मध्ये  नव्या पिढीच्या नव्या जाणीवा चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहेत. पुण्याच्या पार्श्वभूमीवर, एका उद्योजक कुटुंबातील तीन पिढ्यांचं चित्रण या चित्रपटात करण्यात आलं आहे. बदलत्या एकत्र  कुटुंब पद्धतीवर हा चित्रपट भाष्य  करतो. तसंच आताच्या पिढीची लाइफस्टाइल, त्यांचे व्यावहारिक विचार, नात्यातील गुंता यात मांडण्यात आले आहेत. सचिन कुंडलकर यांनी चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन केलं आहे. वेगळ्या विषयाची फ्रेश मांडणी,  कलात्मकता जपत व्यावसायिक पद्धतीनं केलेली हाताळणी ही सचिनच्या चित्रपटाची खासियत आहे. 

या चित्रपटात अतुल कुलकर्णी, मृणाल कुलकर्णी, सचिन खेडेकर, सतीश आळेकर, ज्योती सुभाष, पौर्णिमा मनोहर, राहुल मेहेंदळे या अनुभवी कलावंतांसह सिद्धार्थ मेनन, आलोक राजवाडे, मृण्मयी गोडबोले, कृतिका देव व सुहानी धडफळे या नव्या दमाच्या कलावंतां सोबत अमित्रियान पाटील हा मराठीतला नवा देखणा नायक या चित्रपटात मुख्य भूमिका साकारतो आहे. 

या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना असलेली विशेष उत्सुकता लक्षात घेता हा सिनेमा ब्रेक शिवाय दाखवण्याचा निर्णय प्रेक्षकांसाठी ख्रिसमस गिफ्ट असल्याची प्रतिक्रिया सोशल मिडीयावर व्यक्त होत आहे.

Web Title: Watch this movie breaks the break

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.