रूपेरी पडद्यावर विक्रम गोखले,अनिकेत विश्वासराव आणि प्रियांका यादव सादर करणार डॉक्टरांच्या वेदना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2017 13:57 IST2017-05-04T08:27:14+5:302017-05-04T13:57:14+5:30

डॉक्टर म्हणजे माणसातला देव! असे म्हंटले जाते. पण हा देव सध्या पायदळी तसेच लाथाबुक्क्यांनी तुडवला जातोय. माणसातल्या या देवाकडून ...

Vikram Gokhale, Aniket Vishwasrao and Priyanka Yadav will be present on the screen. | रूपेरी पडद्यावर विक्रम गोखले,अनिकेत विश्वासराव आणि प्रियांका यादव सादर करणार डॉक्टरांच्या वेदना

रूपेरी पडद्यावर विक्रम गोखले,अनिकेत विश्वासराव आणि प्रियांका यादव सादर करणार डॉक्टरांच्या वेदना

क्टर म्हणजे माणसातला देव! असे म्हंटले जाते. पण हा देव सध्या पायदळी तसेच लाथाबुक्क्यांनी तुडवला जातोय. माणसातल्या या देवाकडून काही चूक होताच कामा नये असा अट्टाहास लोकांचा असतो. आणि त्यामुळेच काही बरे वाईट झाले, तर ह्याच देवाला मारायला देखील लोक धजावत नाही. अश्या या पेशंटच्या नातेवाईकांचा रोष पत्करणाऱ्या, आणि नेहमीच दडपणाखाली वावरणाऱ्या आजच्या डॉक्टरांची कैफियत मांडणारा 'चुकलंच जरा डॉक्टर होऊन' हे गाणे लवकरच आपल्यासमोर येत आहे. विक्टरी व्हिजन बॅनरखाली अभिनेत्री प्रियांका यादव निर्मित 'चुकलंच जरा डॉक्टर होऊन' हे गाणे डॉक्टरांच्या मानसिकतेचा वेध घेते.  




डॉक्टरांना सतत आव्हानाला सामोरे जावे लागत असते, रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी ते नेहमीच आपल्या जीवाचे रान करत असतात. त्यामुळे उपचारादरम्यान काही बरे वाईट झाल्यास, डॉक्टरांना मारहाण करणे योग्य नाही, असा संवेदनशील संदेश हे गाणे लोकांना देते. ह्या गाण्यात अनिकेत विश्वासराव आणि प्रियांका यादव तसेच ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी डॉक्टरांच्या भूमिका केल्या असून, डॉक्टरांचे भावविश्व मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी  यात केला आहे. शिवाय अरुण पटवर्धन, संतोष मानकर हे कलाकार देखील यात असणार आहे.     




विशेष म्हणजे या गाण्यात वास्तविकता दाखविण्यात आली आहे. हल्ल्याच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या रॅलीत ख-या डॉक्टरांचा समावेश करण्यात आला असल्यामुळे या गाण्याला जिवंतपणा लाभला आहे.प्रवीण राजा कारळे दिग्दर्शित 'चुकलंच जरा डॉक्टर होऊन' ह्या गाण्याचे रोहन पटेल यांनी संगीत दिग्दर्शन केले असून, सुरेश वाडकर, डॉ. उत्कर्ष शिंदे आणि वैशाली सामंत या गोड गळ्यांच्या गायकाचा आवाज त्याला लाभला आहे. डॉक्टरांची बाजू मांडणाऱ्या या गाण्याचे बोल काही डॉक्टरांनीच लिहिले आहेत. डॉ. स्वप्नील मानकर, डॉ. सुनंदा धीवरे अशी त्यांची नावे असून अविनाश घोडके यांनी देखील हे गाणे शब्दबद्ध करण्यात त्यांना सहाय्य केले आहे. अमोल माने यांनी संकलित केलेल्या या गाण्याचे छायाचित्रण मौलादास गुप्ता यांनी केले असून, कलादिग्दर्शक गिरीश कोळपकर यांनी ते अधिक सुंदर बनवले आहे. तसेच 'चुकलंच जरा डॉक्टर होऊन' या गाण्याच्या कार्यकारी निर्मात्याची धुरा प्रमोद मोहिते यांनी संभाळली आहे. डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या मनोवृत्तीला आळा घालणे गरजेचे आहे, आणि त्यासाठीच डॉक्टरांच्या बाजूने विचार करण्यास भाग पाडणारे हे गाणे प्रेक्षकांना भावूक करून सोडेल अशी आशा आहे.

Web Title: Vikram Gokhale, Aniket Vishwasrao and Priyanka Yadav will be present on the screen.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.